शक्तिपीठ महामार्गाचे अग्रणी नदीत केले विसर्जन..!
शक्तीपीठ महामार्ग रद्दच करायला शासनाला भाग पाडणार : भाई दिगंबर कांबळे
आधुनिक केसरी न्यूज
सचिन सरतापे
म्हसवड : गव्हाण येथील अग्रणी नदीत शक्तिपीठ महामार्ग भ्रष्टाचाराचे गाठूड. प्रतीकात्मक पुतळ्याचे विसर्जन करण्यात आले शासनाने लादलेला शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांनी विसर्जन करून शासनाला इशारा दिला शासनानेही शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा..असे न झाल्यास शक्तिपीठ महामार्ग रद्दच करायला आम्ही भाग पाडू.. यावेळी जोरदार घोषणाबाजी देत शक्तिपीठ महामार्ग प्रतीकात्मक पुतळ्याची मिरवणूक काढून अग्रणी नदीत विसर्जन करण्यात आले.
रद्द करा रद्द करा शक्तिपीठ रद्द करा, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, शेतकरी एकजुटीचा विजय असो, विसर्जन विसर्जन शक्तिपीठ महामार्गाचे विसर्जन, इंकलाब जिंदाबाद, अशा जोरदार घोषणाबाजी देण्यात आली शासनाला शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत, गेली दीड वर्षापासून शेतकऱ्यांनी फोडलेला टाहो ऐकू येत नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीत शासन दगड झाले आहे.. म्हणून आज शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी दगडाच्या शासनाची पूजा आरती करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे बॅनर खाली गेली दीड वर्षापासून 12 जिल्ह्यातील बाधीत शेतकरी भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करीत आहेत. शक्तीपीठ महामार्ग रद्दच करण्यासाठी बाधीत शेतकऱ्यांनी हजारो हरकती संबंधित भूसंपादन अधिकारी यांच्या कडे दिलेल्या होत्या त्यावर सुनावणी प्रांताधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या हरकती फेटाळल्या आहेत . शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता दडपशाही मोजणी करण्याचा घाट शासना कडून घालण्यात आला होता.. सांगली जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील सर्व बाधीत शेतकऱ्यांनी मोजणी अधिकाऱ्यांना हाकलून देत प्रचंड विरोध करीत मोजणी होऊ दिली नाही.. शासनाला वारंवार निवेदने देऊनही शासन दडपशाही करीत आहे.. सर्व बाधीत शेतकरी शासनाचा निषेध करीत करण्यात आला. लक्ष्मी मंदिर अग्रणी नदी गव्हाण मध्ये शासनाच्या धोरणाचा निषेध करीत अनंत चतुर्दशी दिवशी आज शक्तिपीठ महामार्गाचे विसर्जन करून शासनाला इशारा देण्यात येणार आहे , आम्ही शक्तिपीठ महामार्ग विसर्जन करून आमच्या कडून हा महामार्ग रद्दच केला आहे तुम्हीही शेतकऱ्यांच्या मागणीचा सन्मान करून शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा असे न झाल्यास येणाऱ्या काळात अतितीव्र आंदोलन करण्यात येईल.. कुणीही मागणी न केलेला , गरज नसलेला, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा, शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा, रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा , नदी काठावरील गावांना पुराचा प्रचंड मोठा धोका वाढविणारा हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव बापू साळुंखे, काँग्रेस किसान आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष जोतीराम जाधव , गव्हाण चे सरपंच हणमंत पाटील, माजी उपसरपंच दत्ता पवार यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष राज्य भाई दिगंबर कांबळे संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण राज्य प्रवकता दत्तात्रय पाटील, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे कार्याध्यक्ष भूषण गुरव विष्णु सावंत , हणमंत सावंत, पै गजानन सावंत वामन कदम शिवाजी शिंदे,सुनील कांबळे, गजानन पाटील, राहुल जमदाडे, रमेश कांबळे , गजानन सावंत, सुभाष जमदाडे, श्रेयस लांडगे, धनाजी पाटील, रफिक मुलाणी, जगन्नाथ पाटील, नवीन पाटील, महादेव नलावडे, वसंत सुर्यवंशी माणिक यादव , सागर यादव व संघर्ष समितीचे पदाधिकारी इतर बाधीत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List