जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले..!
आपेगाव येथील पालखी पुल पाण्याखाली
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण, जायकवाडी धरण परिक्षेत्रात तसेच वरील धरणातील पाण्याची आवक येत असल्याने रविवारी सकाळपासून जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडुन 1 लाख तेरा हजार क्युसेकने पाणी गोदावरीत विसर्ग करण्यात आला. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, विहरी तुडुंब भरल्या असुन गोदावरीच्या जल फुगवट्याचे पाणी शेतात पसरल्याने पिकाचे नुकसान होवु होत आहे. दरम्यान 11 वाजे दरम्यान जायकवाडी धरणातुन विसर्ग 89 हजार क्युसेक करण्यात आला.
गोदावरी नदीला आलेल्या पुरानंतर पैठण, गेवराई तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पैठण तालुक्यातील कुरण पिंपरी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे,
पुरामुळे परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत, अनेक घरांना पाणी शिरण्याची शक्यता आहे आणि गोदावरीला पुर आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना राहण्याचे आवाहन केले आहे आणि नदीकाठी कोणीही येऊ नये, अशी सूचना दिली आहे. दरम्यान सकाळी आपेगाव येथील पालखी पुलावर पाणी असल्यामुळे कुरणपिंपरी व ईतर गावाचा संपर्क तुटला होता परंतू दुपारच्या नंतर जायकवाडी तुन विसर्ग कमी झाल्याने आपेगाव येथील पुल उघडा आहे़ दरम्यान शनिवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कपाशी, सोयाबीन, मुग, तुर या पिकात पाणी साचल्याने पिके वाया जातीलच त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, शेषनारायण दसपुते, प्रविण औटे,यांनी केली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List