श्री संत गजानन महाराज संस्थान ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 11 लाखांची मदत
आधुनिक केसरी न्यूज
दिपक सुरोसे
शेगांव : दि. 28 सध्या राज्यभरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून अनेक गावांमध्ये पूराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या पार्श्वभूमीवर श्री संत गजानन महाराज संस्थानच्या (पब्लिक ट्रस्ट रजि.न.ए.२५० बुल) शेगांव च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 11 लाखांची मदत दिली आहे.
श्री गजानन महाराज संस्थान हे भाविकांनी दिलेल्या देणगीवर चालते. भाविक आणि मंदिर संस्थान यांचे अतूट नाते आहे. हाच धागा जपत संस्थान नेहमीच सामाजिक बांधिलकी पार पाडत आले आहे. राज्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास श्री गजानन महाराज संस्थान आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावून येते. याआधीही कोल्हापूर,सांगली, सातारा परिसरातील महापुराच्या काळात मंदिर संस्थानच्या वतीने पूरग्रस्तांना दि.24 ऑगस्ट 2019 मध्ये पूरग्रस्तांसाठी श्री गजानन महाराज संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटी 11 लाख रुपयांची मदत दिली होती.
सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे श्री गजानन महाराज संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी 11 लाख रुपये दिले आहे
जमिनी खरडून गेलेल्या आहेत. घरांची पडझड झालेली आहे. पिकांचे नुकसान झालेले आहे. जनावरे वाहून गेलेली आहेत. अशा गरजू शेतकऱ्यांना मदतीसाठी श्री गजानन महाराज संस्थान भाविकांप्रती आणि समाजाप्रती असलेली ही बांधिलकी कायम ठेवत आज ही शेगांव श्री गजानन महाराज संस्थान पूरग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. श्रीच्या भक्तांशी असलेले भावनिक नाते जपत मंदिर संस्थान नेहमीच संकटाच्या काळात समाजासाठी तत्पर राहिले आहे. आजही तेच धागे पुन्हा घट्ट विणले जात आहेत. पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी होत श्री गजानन महाराज संस्थान त्यांना आधार देत आहे. समाजाप्रती असलेली ही निरंतर बांधिलकी आणि श्रींच्या भक्तांशी असलेले भावनिक नाते श्रींचे संस्थान नेहमीच जपत आले आहे
श्री संत गजानन महाराज संस्थान हे केवळ धार्मिक कार्यापुरते मर्यादित नसून, सेवाभावी व समाजोपयोगी उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. संस्थानचे, महाप्रसाद,शिक्षणक्षेत्रातील योगदान, आरोग्यसेवा, जलपुरवठा योजना आणि आपत्ती व्यवस्थापनातील सहकार्य या सर्व कार्याचा देशभरातून गौरव होत आहे. यापूर्वीही दुष्काळ व पूरस्थितीत संस्थानने शासनाला भरीव मदत दिली होती.
विशेष म्हणजे, स्वच्छतेच्या बाबतीत श्री संत गजानन महाराज संस्थान देशात नंबर एक मानले जाते. संस्थान परिसरातील स्वच्छता, सुव्यवस्था आणि हरिताई याचे अनुकरण देशभरातील विविध संस्था करतात. येथे येणारा भाविक स्वच्छता, शिस्त आणि शांततेचा अनुभव घेतो. त्यामुळेच संत नगरी शेगाव ही केवळ अध्यात्मिक नाही तर स्वच्छतेचीही राजधानी मानली जाते.
श्री गजानन महाराजांचा संदेश हा भक्ती, सेवा आणि समर्पणाचा आहे. त्याच धर्तीवर संस्थानने संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जात “सेवा हाच धर्म” हा बोध प्रत्यक्ष कृतीत उतरवला आहे. या भरीव योगदानामुळे पुरग्रस्तांना दिलासा मिळणार असून, समाजात सेवाभावी व स्वच्छतेच्या कार्यात आघाडी घेणारे संस्थान हे खरेच प्रेरणास्थान ठरले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List