नाथ मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापाऱ्यांनी साहीत्य हलवले
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण: जायकवाडी धरणातुन रविवारी सकाळ पासुन गोदावरीत मोठ्या प्रमाणात सव्वा दोन लाख पाण्याचा विसर्ग गोदापात्रात केल्याने पैठण शहरातील सखल भागात नाल्याद्वारे पुराचे पाणी शिरत असुन संत एकनाथ महाराज समाधी मंदिराकडे जाणार्या पुर्व पच्छिम दिशेकडील मंदिराकडे जाणार्या रस्ते जलमय झाले,गागाभट्ट चौकातुन न. प. कडे जाणारा रस्त्यावर पुराचे पाणि तसेच गोदावरीतुन शहरात नाल्यावाटे पाणि शहरात येत असल्याने 2006 ची पुरावृत्ती नको म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापाऱ्यांनी आणखी पाणी वाढल्यास नुकसान होवु नये म्हणून दुकानातील साहीत्य हलवले असुन शहरातील सखल भागातील नागरिकांना शाळेत निवासासाठी हलवले आहे.
पैठण बिड कडे जाणार्या रस्ता नवगाव येथील पुलावर पाणी आल्याने तसेच आपेगाव येथील बीड कडे जाणार्या पालखी पुल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे. दरम्यान जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता गोदावरी त विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदी काठी जावु नये.
असा ईशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List