सरपंच पती देवचंद पवार यांची दादागिरी..!
आधुनिक केसरी न्यूज
जळगाव जा : २६ सप्टेंबर रोजी सरपंच पती देवचंद पवार यांनी रोजगार सेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जळगाव जामोद पंचायत समितीच्या गेटसमोर हात जोडून माफी मागितली व तो विडिओ आधुनिक केसरी व्हाट्सअप ग्रुप वर टाकल्याची मानवतेला शरमिंदा करणारी घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की,सागर झनके हे दादुलगाव ग्रामपंचायत रोजगार सेवक आहेत.त्यांचे मानधन सरपंच सचिव यांचे खात्यात जमा होते. त्यामुळे ग्रामसेवक अनिल अंबडकर साहेबांनी सागर झनके यांना अकरा हजाराचा चेक सही व शिक्यानिशी दिला.परंतू गेल्या पंधरा दिवसांपासून सरपंच चेकवर सही देण्यास टाळाटाळ करत आहे.सदरचा विषय रोजगार सेवक सागर झनके यांनी गटविकास अधिकारी संदीप मोरे साहेबांना सुद्धा सांगितला होता.सागर झनके यांना सरपंच सिमा देवचंद पवार सही देत नसल्याने व त्यांचे पती देवचंद पवार जे स्वतःला सरपंच समजतात त्यांनी सुद्धा अरेरावी करत सही देत नाही असे सांगितले त्यामुळे सागर झनके यांच्या चेकवर सही का देत नाही विचारायचा तालुक्यातील सर्व रोजगार सहाय्यक दादुलगाव येथे आले परंतु सरपंच हजर नसल्याने ते जळगाव जामोद पंचायत समितीला आले.त्याच्या थोड्या वेळातच सरपंच पती देवचंद पवार पंचायत समितीला हजर झाला.संदीप दुगाने,रवी जामणिक, देविदास म्हसाळ यांना तुम्ही माझ्या ग्रामपंचायतला का गेले.तुम्हाला अधिकारी आहे का.तुम्ही तात्काळ माफी मागा अन्यथा मी माझ्या पत्नीला बोलावून तुमच्या नावाची खोटी तक्रार करतो.अशाप्रकारे रोजगार सेवक संघटनेच्या सदस्यांवर दादागिरी,दबाव आणून जळगाव जामोद पंचायत समितीच्या गेटसमोर हात जोडून माफी मागितली.व त्याचा विडिओ काढलाआणि तो विडिओ आधुनिक केसरी ग्रुप व इतर सोशल मिडिया वर टाकला.तो विडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.त्यामुळे अशा गावगुडावर पोलिस प्रशासनाचा दबाव नाही त्यामुळेच ही चटणी घडली आहे.सदर घटनेमुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.सागर यांना चेकवर सही तर दिलीच नाही उलट रोजगार सेवकांना माफी मागायला लावली. त्यामुळे या गावगुंडावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी.अशा गवगुंडाना पोलीस खाक्या दाखविल्याशिवाय ते वठणीवर येणार नाहीत. सदर वडिओवर जिला पोलीस प्रशासन व तालुका पोलिस प्रशासन काय कार्यवाही करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List