खडकपूर्णाचे सर्व वकद्वार दीड मीटरने उघडले महामार्गावरील पूल ५ वर्षां नंतर पाण्याखाली 

खडकपूर्णाचे सर्व वकद्वार दीड मीटरने उघडले महामार्गावरील पूल ५ वर्षां नंतर पाण्याखाली 

आधुनिक केसरी न्यूज

 देऊळगाव राजा  : संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प १००% भरल्याने प्रकल्पाचे सर्व वकृतवार तब्बल दीड मीटरने उघडण्यात आले आहे. दरम्यान मलकापूर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगाव महीनजीकचा कालचा पुल पाच वर्षानंतर प्रथमच पाण्याखाली गेला असून एकाच पुलावरून महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. प्रकल्पातून २९५२.२२ घनमीटर क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. गेल्या वीस तासात धरण क्षेत्रात जेमतेम ३३ मिलिमीटर पाऊस झाला असला तरी जाफराबाद भोकरदन,सिल्लोड तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकपूर्णा नदीला पूर आला आणि संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प शंभर टक्के भरला. दरम्यान आज सकाळी बुलढाणा पाटबंधारे विभाग अंतर्गत खडकपूर्णा प्रकल्प व्यवस्थापना ने प्रकल्पाचे सर्व १९ वक्रद्वार दीड मीटरने उघडण्याचा निर्णय घेतला. परिणामी खडकपूर्णा नदीपात्रात पूर आला असून नदी दुधडी भरून वाहत आहे. यामुळे सोलापूर मलकापूर महामार्गावरील देऊळगाव मही नजीकचा खालचा पूल पाण्याखाली आला असून फुलावर सुमारे एक फुटाने पाणी वाहत आहे. पुलावरून पाणी जात असल्याने देऊळगाव राजा ते चिखली बुलढाणा खामगाव कडे जाणारी वाहतूक वरच्या पुलावरून वळविण्यात आली आहे. सद्यस्थितीत प्रकल्पातून २९५२.२२ घमी क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे. खडकपूर्णा नदीकाठी असलेल्या देऊळगाव राजा सिंदखेडराजा आणि लोणार तालुक्यातील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात गुरे लहान मुले तसेच गावकऱ्यांनी नदीपात्र ओलांडू नये व कोणी मासेमारी तथा नदीपात्रातून वाहतूक करू नये अशा सूचना पाटबंधारे विभाग अंतर्गत खडकपूर्णा प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग देऊळगाव महीचे अधिकारी सुमित येसानसुरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली, दि. 29 सप्टेंबर (जि.मा.का.) : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून...
राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे
खडकपूर्णाचे सर्व वकद्वार दीड मीटरने उघडले महामार्गावरील पूल ५ वर्षां नंतर पाण्याखाली 
नाथ मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापाऱ्यांनी साहीत्य हलवले 
श्री संत गजानन महाराज संस्थान ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 11 लाखांची मदत
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
येरळा नदी पत्रातून एक जण वाहून गेले