खडकीजवळ बस अपघात; चालक जखमी पण प्रवासी थोडक्यात बचावले
आधुनिक केसरी न्यूज
निलेश मोरे
खडकी : दि२०पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे करणारा प्रकार खडकी येथे घडला. पिंपरी चिंचवड आगाराची (MH-14-LX-6563) बस पुण्याहून सोलापूरकडे जात असताना अचानक ब्रेक निकामी झाले आणि बसने समोरून जाणाऱ्या मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
या धडकेत बस चालक मधुकर रामराव जाधव (वय 43, रा. नांदेड) जखमी झाले असून त्यांना माऊली ॲम्बुलन्सचे हनुमंत काळभोर यांच्या तत्परतेने भिगवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवासी थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला.सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण बसचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे निकृष्ट दर्जाचे ब्रेक आणि देखभाल नसलेली वाहने यामुळे राज्य परिवहन विभागाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परंतु पोलीस प्रशासन वेळेच अपघात स्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत करण्यात आली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List