अचलेर येथील तमाम शेतकऱ्यांचे लोहारा तहसिलदारांना निवेदन एकरकमी आर्थिक मदत देण्याची मागणी
आधुनिक केसरी न्यूज
महेश गायकवाड
लोहारा : तालुक्यातील अचलेर येथील असंख्य शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थानी लोहाऱ्याचे तहसीलदार
यांची भेट घेऊन पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीतील पिकांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ एकरकमी आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन सादर केले.
अचलेर व पंचक्रोशीतील भागात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी आधीच नैसर्गिक संकटाशी दोन हात करत असताना सलग पावसामुळे उभी पिके वाया गेली. या पार्श्वभूमीवर अचलेर येथील शेतकऱ्यांनी लोहारा तहसिल कार्यालयात भेट देऊन तहसिलदारांना निवेदन सादर केले.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात सोयाबीन, मूग, उडीद, तुर, बाजरी आदी पिके पावसाच्या अतिरेकामुळे शेतात पाणी साचल्याने पूर्णपणे नष्ट झाल्याचे नमूद केले आहे. शेतकरी वर्ग कर्जबाजारी होत असून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात सरसकट सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून एकरकमी आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. शेतकरी वर्गाला दिलासा मिळावा यासाठी शासनाने त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी तहसिल कार्यालयात दाखल झाले होते. यामध्ये गावातील प्रमुख शेतकरी व पदाधिकारी सहभागी झाले होते. शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आठ दिवसात जेवळी मंडळातील अचलेर येथील पिकाची पंचनामा ।करावे व सरसकट मदत करावे अन्यथा नॅशनल हवे रस्त्यावर आष्टा मोड येथे आंदोलन करून रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे .
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List