सेनगाव पोलीसाची तत्परता अन; विषारी औषध प्राशन तरुणाचा जीव वाचला
आधुनिक केसरी न्यूज
गोपाल सातपुते
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच भागवत मुंडे यांनी आपण विषारी उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास सेनगाव पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून शोधून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोली येथे पाठविल्याने सेनगाव पोलिसाच्या तत्परतेने एका निष्पाप तरुणाचा जीव वाचविण्यास फार मोठी मदत झाली असल्याने सेनगाव पोलिसांचे माणुसकीचे व तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील सदन शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते भागवत बळीराम मुंडे यांनी स्वतः उंदीर मारण्याचे विषारी औषध पिऊन स्वतःचा व्हिडिओ बनवून हिंगोली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकुळे यांना पाठवून मी माझा जीव संपवित असल्याचे सांगताच आमदार बुटकुळे यांनी लगेच सेनगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांना दूरध्वनीवरून माहिती देऊन त्या तरुणास तात्काळ शोधून त्यांच्या जीव वाचवण्याच्या सूचना पोलीस प्रशासना देण्यात आल्याने ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक मस्के यांनी आपल्या पोलीस टीम सोबत घेऊन व सायबर च्या माध्यमातून संबंधित तरुणाच्या मोबाईलचे लोकेशन काढून सेनगाव शहरा अंतर्गत दोन तासाची शोध मोहीम घेतली असता सदर तरुण भागवत मुंडे हा रिसोड सेनगाव रोडवरील दिपलिंग महादेव मंदिराच्या परिसरात बेशुद्ध अवस्थेत पडलेला स्थितीत आढळून आल्याने तात्काळ पोलीस प्रशासनाने त्यास प्राथमिक उपचार कमी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शासकीय पोलीस गाडीमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नाकाडे हॉस्पिटल हिंगोली येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती ठाण्याचे स. पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी दिली सेनगाव पोलिसाच्या तत्परतेचे व केलेल्या माणुसकीचे सर्वत्र चर्चा होत असून त्यांचे कौतुक होत आहे या कामे सेनगाव पोलीस ठाण्याचे स. पोलीस निरीक्षक दीपक मस्के ,सेनगाव शहर बीट अंमलदार सुभाष चव्हाण, सेनगाव नगरपंचायत चे गटनेते नगरसेवक अमोल तिडके, राजू जाधव, मारकळ, सायबरचे दत्ता नागरे, चालक अंभोरे आदींनी शोध मोहिमेत सहभाग नोंदविला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List