हैदराबाद मुक्ती संग्राम आंदोलनाचा दणका आणि भेट,चर्चा..!
आधुनिक केसरी न्यूज
हैदराबाद मुक्ती संग्रामादिनानिमीत्त मराठवाड्यात येतानाच राज्यसरकार आणि मुख्यमंत्री यांनी किमान दोन दिवसाच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीचे नियोजन केले पाहिजे व मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे व निर्णय केले पाहिजे नसता प्रसंगी तिव्र आंदोलन करून मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील हा इशारा जाहीर पत्रकार परिषदेत दिल्यानंतर व तसा ईमेल CMO ला पाठवल्यानंतर सुत्रे हलली आणि छत्रपती संभाजी नगर चे पोलिस आयुक्त आमचे स्नेही श्री प्रवीण पवार यांच्या मध्यस्थीने मा मुख्यमंत्री यांची काल रात्री उशिरा विमानतळावर भेट व चर्चा झाली
दरवर्षी मराठवाडयात किमान दोन
दिवस मंत्रीमंडळ बैठक घेण्यात यावी_
२_ 2016आणि २०२३ च्या संभाजी नगर
येथे झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील तब्बल 95 हजार निधी तरतूद व कामा विषयी स्पष्टता ३_ संपुर्ण मराठवाड्यात सरसगट ओला दुष्काळ जाहीर करणे ४_ मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे पुर्नजिवन करणे यासह मराठवाड्यातील सिंचन,विकास , रेल्वे, शिक्षण, संदर्भात त्यांनी आमच्या मागण्या व निवेदन ऐकून घेऊन विषय समजून घेतले चर्चा केली आणि विस्तृत चर्चेसाठी मुंबईत बैठकीचे आश्वासन दिले व तातडीने जालना- मराठवाडा ICT व बार्टीच्या उपकेंद्राचा विषय मार्गी लावू असे सुस्पष्ट सांगितले! यावेळी मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत माझे स्नेही व ग्रामीण विकास मंत्री Jaykumar Gore ना.Sanjay Shirsat - संजय शिरसाट @माजी केंद्रीय राज्यमंत्री Dr. Bhagwat Karad आ. प्रशांत बंब,आ नारायण कुचे, आमचे मित्र आ संजय केणेकर, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, डीसीपी नवले पीआय नवनाथ आघाव आदी उपस्थित होते! तर शिष्टमंडळात माझ्यासह_
मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंच चे पदाधिकारी सर्वश्री राजेंद्र दाते पाटील, दिनेश फलके, सतिश पट्टेकर , आनंद लोखंडे शरद देशमुख , मुजीब खान आदी उपस्थित होते!
डॉ संजय लाखेपाटील
संस्थापक अध्यक्ष
मराठवाडा अनुशेष आणि विकास मंच
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List