गरजा कमी ठेवा; स्वाभिमानाने जगा : ना.पंकजाताई मुंडे बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा झाला सन्मान..!
आधुनिक केसरी न्यूज
बीड : संत भगवानबाबांनी एक्कर विका पण शाळा शिका असा संदेश दिला होता. आजच्या युगामध्ये शिक्षण तर महत्वाचे आहेच. परंतु या पिढीतील विद्यार्थ्यांना‘ गरजा कमी ठेवा आणि स्वाभिमानाने जगा ’ असा संदेश देण्याची गरज आहे. परिस्थितीशी समझोता करा परंतु तत्वाशी तडजोड कधीच करु नका.आपल्याकडे कमी पैसे आहेत याची खंत वाटण्यापेक्षा आपल्याकडे जास्त संस्कार आहेत याचा अभिमान वाटू द्या असा मौलिक सल्ला राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी दिला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी समरस व्हायला शिकवले तर त्यांना शिस्तीचे वेगळे धडे देण्याची आवश्यकताच पडणार नाही.प्रत्येक आदर्श नागरिक घडवण्यामध्ये शालेय जीवनातील शिक्षकांची भूमिका खुप महत्वाची असते असेही ना.मुंडे यांनी सांगितले. बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात योगदान देणार्या मान्यवरांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे हे होते. तर महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष ना.समीर काझी,भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख,भाजपा नेते संतोष हांगे,बीड जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आदित्य सारडा, जेष्ठ नेते नवनाथ शिराळे, अल्पसंख्यांक आघाडीचे नेते सलीम जहाँगीर, शहराध्यक्ष अशोक लोढा, संपादक वैभव स्वामी, संपादक बालाजी तोंडे यांचीही विशेष उपस्थिती होती.
पत्रकार संघाच्या वतीने कला,क्रीडा,संगीत,नाट्य, संस्कृत,वेद,मदरसा,वक्तृत्व, प्रशासन,बुद्धिबळ,कौशल्य विकास,योग प्रशिक्षण,अबॅकस,आश्रमशाळा,मतीमंद शाळा आणि सीबीएससी, इंग्रजी शाळा यासह आदर्श शिक्षणसंस्था,आदर्श शाळा,आदर्श शिक्षक पतसंस्था,सामाजिक सहभागातून विकसित झालेली शाळा अशा वैविध्यपुर्ण शैक्षणिक पुरस्कारांचे वितरण पंकजाताईंच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलतांना ना.पंकजाताई म्हणाल्या की, माझेही शालेय शिक्षण परळीमध्ये झाले.पहिलीच्या वर्गात असताना विद्यार्थ्यांना फरशीवर बसावे लागायचे. हे पाहिल्यानंतर स्व.मुंडे साहेबांनी आमच्या शाळेतील सर्व वर्गात मुलांना बसण्यासाठी आसन पट्ट्यांची व्यवस्था केली होती याची आठवण ताईंनी सांगितली.जीवनामध्ये कितीही मोठ्या पदापर्यंत गेले तरी मी माझ्या शालेय जीवनातील शिक्षकांना कधीही विसरु शकणार नाही. कारण त्यांनीच खर्या अर्थाने माझा पाया भक्कम केला असल्याचे ताई म्हणाल्या. घरात रा.स्व.संघाचे विचार असल्यामुळे आई-वडिलांनी शक्य असतानाही इंग्रजी शाळेत न पाठवता जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत आम्हा तीनही बहिणींना प्रवेश दिला होता.संत भगवानबाबांनी एक्कर विका पण शाळा शिका हा संदेश त्या काळात दिला. माझे आजोबा, मामा, मावशी,काका हे सर्वजण शिक्षक होते. त्यामुळे शिक्षणाचे महत्व आजोळच्या वंश परंपरेने आपोआप कळाले होते.आता काळ खुप बदलला आहे. शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा पराकोटीची वाढली आहे. साधन सुविधांना नको तेव्हढे महत्व आले आहे. अशा वेळी सधन असणे आणि समृध्द असणे यातला मुलभूत फरक आजच्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली.आई-वडिलांनी चांगल्या किंमतीचा मोबाईल घेवून दिला नाही म्हणून आत्महत्ये सारखे पाऊल उचलणारे मुलं पाहिल्यानंतर मन व्यथित होते.आपल्याकडे एक वेळ पैसा कमी असला तरी चालेल परंतु संस्काराचे धन मात्र खुप असले पाहिजे.सधन असण्यापेक्षा समृध्द असण्याचा अभिमान वाटला पाहिजे असे पंकजाताईंनी सांगितले.मुलांना खरोखर शिस्तीचे धडे द्यायचे असतील तर त्यांना पर्यावरणाशी समरस व्हायला शिकवा असेही त्यांना आवर्जुन सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बीड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रतिक कांबळे यांनी केले.तर प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष नितीन क्षीरसागर यांनी केले.
बुलेट पाँईट
17 सप्टेंबर रोजी बीडमध्ये रेल्वेचे लोकार्पण झाले.हा श्रेयवादाचा विषय नसून ही आमची स्वप्नपुर्ती आहे असे पंकजाताई म्हणाल्या.
*स्व.मुंडे साहेबांच्या मागणीवरुन स्व.विलासराव देशमुख यांनी या रेल्वे मार्गासाठी 50 टक्के खर्च राज्य शासनाने करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जेव्हा या दोघांचेही निधन झाले तेव्हा मात्र बीडच्या रेल्वेचे आता काय होणार? असा प्रश्न पडला होता.नरेंद्र मोदी यांनी बीड येथे जाहिर सभेत स्व.मुंडे साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी बीडला रेल्वे आणू असे जाहिर अभिवचन दिले होते. ते त्यांनी पुर्ण केले असे ताई म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पंकजाताईंनी बीड रेल्वेचे श्रेय दिले.ज्या ठिकाणी स्त्रीचे अस्तित्व असते तिथे कारभार चांगला चालतो अशी विशेष टिप्पणी ताईंनी आपल्या भाषणात केली. ग्रामविकास मंत्री असताना दिड लाख शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या सोयीच्या ठिकाणी केल्या. बीडच्या कार्यक्रमात अशा बदल्या झालेले अनेक शिक्षक ताईंचे आभार मानण्यासाठी आले होते.*सरकार आम्हाला पगार देते,बंगला देते. तरी सुध्दा बदल्यांसाठी पैसे घेतलेच नाही पाहिजे. म्हणूनच ज्या ज्यावेळी मी मंत्री झाले त्या त्या वेळी पारदर्शक बदल्यांचा प्रयोग केल्याचे ताई म्हणाल्या. *मधल्या काळात बीड जिल्ह्याची अक्षम्य अशी बदनामी झाली. वास्तविक आमचा हा बीड जिल्हा खुप चांगला आहे. भलेही आमच्या विकासाला उशिर झाला. कारण आम्ही स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष निजामाच्या राज्यात होतो.जो भाग ब्रिटिशांच्या ताब्यात होता त्या ठिकाणी विकास अगोदर पोहचला. आता उशिरा का होईना रस्ते आणि रेल्वेच्या माध्यमातून बीड जिल्हा समृध्द होत असल्याचे ताईंनी सांगितले. *बीड जिल्हा पत्रकार संघाच्या शिक्षक पुरस्कार वितरणाला पुढच्या वर्षी सुध्दा मी नक्की येणार आहे आणि हा कार्यक्रम आणखी चांगल्या पध्दतीने आपण घेवू अशा शब्दात ताईंनी संघाच्या पदाधिकार्यांचे कौतुक केले.
दुनिया को जीतने का हौसला रखो
तूफान मे ताश का घर नही बनता । रोने से बिगडा मुक्कदर नही सुधरता॥ दुनिया को जीतने का हौसला रखो। एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकन्दर नही बनता ॥
या शायरीने आपल्या भाषणाची सुरुवात करत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, कलागुणांची पारख करण्यासाठी आपल्या जीवनात चांगला शिक्षक मिळावा लागतो आणि तो जर मिळाला तर जन्माचे सोने व्हायला वेळ लागत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील पाचवीच्या वर्गात शिकणार्या एका मुलाने गीत गायले, शिक्षकाने त्याचा व्हिडिओ तयार करुन प्रसिध्द केला. तो पाहून प्रसिध्द संगितकार अजय -अतुल यांनी त्या मुलाला संधी दिली.हे केवळ त्या शिक्षकामुळे घडू शकले. आज ज्यावेळी केंद्र आणि राज्याच्या स्पर्धा परिक्षांचे निकाल लागतात तेव्हा ग्रामीण भागातून आलेली मुलं मोठ मोठ्या पदावर निवडले जात आहेत. याचा अर्थ बुध्दीमत्ता ही आता मर्यादित राहिली नसून त्याचे सामर्थ्य सर्वदुर पोहचले आहे. त्यासाठी फक्त जिंकण्याची जिद्द असली पाहिजे.आणि ही जिद्द मुलांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याचे मुंडे म्हणाले.
यांचा झाला सन्मान
गणेश मैड, मारुती पठाडे,संतोष दाणी, सौ.रचना सचिन जाधवर, सुशील उचले ,दत्तात्रय क्षीरसागर,वेदमूर्ती अमोलशास्त्री जोशी, गंगाधर देशमुख , सौ.दीप्ती देशमुख, राधा तांबे,धर्मनाथ शिंदे, कल्पना मुंडे,सौ.शीतल काळदाते, प्रा.दिनकर प्रभाकर थोरात,मौलाना अब्दुल हादी ,डॉ. अशोक सखाराम घोडके, सुशील दिनेशराव पवार,अंजली खोबरे,प्रा.भालचंद्र देशमुख,दिलीप मुरलीधर कुलकर्णी,सौ. ज्ञानेश्वरी पवन घाडगे,सौ. श्रद्धा पिंगळे (धांडे),सौ.मैथिली मिरगणे,सौ. दक्ष दयाराम वानखेडे,बाळासाहेब कळसाने, अमर रामचंद्र पुरी,प्रा.बिभीषण चाटे,,देविदास डोळे,शरद शेजाळ,लक्ष्मीकांत दोडके,गिरीश भावले,सुनील फुलचंद मुंडे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List