सोलापुरातील  तडीपार गुंडाचा लातूर मध्ये पाळत ठेवून खून सोबत असलेल्यासोनाली भोसले या तरुणीलाही भोसकले 

सोलापुरातील  तडीपार गुंडाचा लातूर मध्ये पाळत ठेवून खून सोबत असलेल्यासोनाली भोसले या तरुणीलाही भोसकले 

आधुनिक केसरी न्यूज

महेश गायकवाड 

सोलापूर : सोलापुरातील  तडीपार गुंडाचा लातूर मध्ये पाळत ठेवून काल रात्री खून  करण्यात आला आहे. त्याच्या सोबत  असलेल्या सोनाली भोसले या तरुणीलाही  भोसकण्यात आले असून तिच्यावर खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भागासह विजापुर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गुंड अनमोल केवटे याचा वावर होता त्याच्यावर खंडणी  गोळा करणे मारामारी जबरदस्तीने हप्ता वसूल करणे  या सह इतर ही गुन्हे दाखल करण्यात आले होते.  त्यामुळे त्याच्यावर सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार ची कारवाई करण्यात आली होती 

सोलापूर मधील नामचीन गुंड असलेला अनमोल केवटे हा काल लातूर येथे गेला होता लातूर जिल्ह्यातील खाड गाव रोड नजीक त्याच्या कारला काही जणांच्या टोळीने कट मारला होता. ही कट मारल्यानंतर अनमोल केवटे याने त्यांना जाब विचारला असता यावेळी दोन्ही कडून बाचाबाची या बाचाबाची चे पर्यावसान अनमोल च्या खुना मध्ये झाले आणि त्याला क्षणात  संपवले गेले ;

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा कार्यकर्ता असलेला आणि त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असलेला अनमोल केवटे यांच्या खून प्रकरणी लातूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर यातील पाच ते सहा जण फरार झाले असून लातूर आणि सोलापूर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेल्या 
 पैकी शुभम पतंगे याला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

बुधवारी मध्यरात्रीनंतर लातूरच्या खाडगाव रोडनजीक गाडीला कट मारण्याच्या कारणावरून अनमोल केवटे आणि त्याची मैत्रीण सोनाली भोसले सुपेकर हिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.   या हल्ल्यात अनमोल केवटे जागीच ठार झाला, तर सोनाली भोसले हिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान पोलिसांनी सोनाली भोसले हिचा  जबाब घेतला आहे. 

घटनेपूर्वी आम्ही सावधगिरी बाळगली असती तर तो प्रसंग घडला नसता, अशी प्रतिक्रिया अनमोल केवटे यांचा कारचालक नवनाथ धाकपाडे याने पोलिसांसमोर व्यक्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  या घटनेची नवनाथ धाकपाडे यांनीच लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बुधवारी रात्री लातूरहून सोलापूरकडे जाताना खाडगाव स्मशानभूमीजवळ भरधाव जीप कट मारून पुढे गेली. त्यावेळी कट बसला नाही, पण गाडीचा वेग जास्त होता. त्यामुळे अनमोल केवटे यांनी त्याला गाडी नीट चालवता येत नाही का, असे म्हटले. त्यानंतर तो पुढे गेला आणि जीप आमच्या कारच्या समोर आडवी लावली. त्यावेळी परिस्थितीचा अंदाज मला आला होता. आपण गाडी मागे घेऊन निघून जाऊ, कशाला उगीचच वाद घालायचा. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. समोरच्या जीपमधून ती अनेक माणसं खाली उतरली. त्यावेळी माझ्या गाडीमधून हे दोघेही खाली उतरले आणि त्यांच्यात आधी बाचाबाची झाली. काही कळायच्या आतच समोरच्याने हत्यार काढले आणि केवटे यांना भोसकले. त्याच व्यक्तीने महिलेवरही वार केले, कार रिव्हर्स घेण्याची माझी इच्छा होती, केवटे यांनी ऐकले असते तर हा प्रकार टाळता आला असता, अशा शब्दात कारचालकाने आपली प्रतिक्रिया दिल्याची माहिती पुढे आली आहे.

केवटे खून प्रकरणी फिर्यादीत चार जण सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेतील आरोपी विष्णू मामडगे आणि त्याचा चुलत बंधू मंथन मामडगे हे दोघेही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे एक, तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एक अशी दोन पथके आरोपींच्या शोधासाठी तैनात करण्यात आली आहेत. मुख्य आरोपी विष्णू मामडगे गुन्हेगारी वृत्ती असलेला क्रुझर जीपचा मालक आहे. विष्णू मामडगे यावर काही गुन्हे दाखल आहेत. याबाबत अधिक माहिती पोलीस घेत आहेत. त्याचा चुलत भाऊ मंथन मामडगे, शुभम पतंगे, वैभव स्वामी अशी आरोपींची नावे आहेत. शुभम पतंगे, वैभव स्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे.


अनमोल केवटे याचे शरद पवारांसोबत फोटो वायरल -

मृत अनमोल केवटे हा मूळ  सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या गावातील होता. अनमोल केवटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा  (शरद पवार गट) कार्यकर्ता असल्याचे सांगत असे. तो अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये कार्यरत होता. शरद पवार, रोहित पवार यांच्यासोबत अनमोल केवटे याचे सोशल मीडियावर फोटो आहेत. अनमोल केवटे याच्यावर देखील सोलापूरच्या विविध पोलीस ठाण्यात पाचपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.  मारामारी, खंडणी वसुली यासारखे गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या लातूर मेळाव्यासाठी अनमोल केवटे हा गेला होता. अनमोल केवटे सोबत जखमी झालेली त्याची मैत्रीण सोनाली भोसले ही देखील सोलापूरची आहे. सोनालीचे मूळ गाव अंतरोळी,  ता दक्षिण सोलापूर जि. सोलापूर हे आहे. सोनाली विवाहित आहेत, त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. मागील काही वर्षांपासून सोनाली भोसले ही भ्रष्टाचार निर्मुलन समितीत कार्यरत आहेत. लातूर मेळाव्यासाठी ती  देखील अनमोलसोबत गेली होती.

अनमोल केवटे याला कार चालकाने  सांगितलं होतं; उगीच वाद नको, आपले आपण इथून निघून जाऊ तरीही... माझे माझे ते दोन शब्द ऐकले नाहीत अनमोल केवटे यांनी माझे ऐकले असते, तर...;  असे म्हणत अनमोल केवटे याच्या ड्रायव्हरने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. घटनेपूर्वी आम्ही सावधगिरी बाळगली असती तर तो प्रसंग घडला नसता, अशी प्रतिक्रिया  कारचालक नवनाथ धाकपाडे याने व्यक्त केली पुढे प्रसंग गंभीर दिसत होता म्हणून  कार रिव्हर्स घेऊन तात्काळ घटनास्थळावरून निघावे असे मला वाटत होते . परंतु अनमोल केवटे यांनी माझे ऐकले नाही त्यांनी गाडी च्या खाली उतरून त्याना कट मारल्याचा जाब विचारायला गेले आणि घात झाला दरम्यान लातूर च्या  खाडगाव स्मशान भूमी जवळील प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या लोकांनी सांगितले की अनमोल केवटे याला मारण्यासाठी च हे लोक आले होते केवळ गाडी ला कट मारून त्यांनी भांडण उकरून काढले आणि क्षणात अनमोल केवटे याचा भोसकून खून करण्यात आला खून करून पळून गेलेल्या पैकी विष्णू मामडगे हा देखील लातूर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर लातूर धाराशिव बीदर जिल्ह्यात मोठ मोठे गुन्हे दाखल असल्याचे कळते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सोलापुरातील  तडीपार गुंडाचा लातूर मध्ये पाळत ठेवून खून सोबत असलेल्यासोनाली भोसले या तरुणीलाही भोसकले  सोलापुरातील  तडीपार गुंडाचा लातूर मध्ये पाळत ठेवून खून सोबत असलेल्यासोनाली भोसले या तरुणीलाही भोसकले 
आधुनिक केसरी न्यूज महेश गायकवाड  सोलापूर : सोलापुरातील  तडीपार गुंडाचा लातूर मध्ये पाळत ठेवून काल रात्री खून  करण्यात आला आहे....
खडकीजवळ बस अपघात; चालक जखमी पण प्रवासी थोडक्यात बचावले
एसटीसाठी १७४५० कंत्राटी चालक व सहाय्यक भरती प्रक्रिया राबवणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे शिबिर नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे : अजित पवार
शंभरी पूर्ण करणाऱ्या रा.स्व.संघाने नथुराम व विखारी विचार सोडून संविधान व गांधी विचार स्विकारावा: हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र शासनाचा विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार; रू.८०,९६२ कोटीं गुंतवणूक तर ४०,३०० रोजगार निर्मिती
अचलेर येथील तमाम शेतकऱ्यांचे लोहारा तहसिलदारांना निवेदन एकरकमी आर्थिक मदत देण्याची मागणी