होंडा सिटी कारच्या धडकेत राजू घाईट यांचा मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज
सागर झनके
मानेगाव : कार व दुचाकीच्या अपघातात तिवडी येथिल राजू घाईट यांना खामगाव येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी माणेगाव येथील पूर्णा नदीवरील नवीन पुलावर घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तीवडी येथील राजू घाईट वय ५० व त्यांचा मुलगा मंगेश घाईट वय अंदाजे २३ वर्ष आपल्या एम.एच.२८ एस. ९०९३ क्रमांक असलेल्या दुचाकीने नांदुरा कडे जात असताना आपल्या नांदुऱ्या वरून जळगाव जामोद कडे येणाऱ्या MH01BU8793 क्रमांकाच्या होंडा सिटी कार चे येरळी मानेगाव येथील नवीन पुलावर टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण व चार चाकी गाडीने डिवाईडरला जोरदार धडक देऊन नांदुरा कडे जाणाऱ्या टू व्हीलर ला धडक दिली. दुचाकी वरील राजू घाईट व त्याचा मुलगा मंगेश घाईट दोघेही गंभिर जखमी झाले. त्यातील राजू घाईट यांचा खामगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्याने मृत्यू झाला तर मंगेश घाईत याला उपचारासाठी अकोला येथे नेण्यात आले. अपघातातील कार बबन पांडुरंग मनोहर यांची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राजू घाईट यांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे तिवडी गावावर शोककळा पसरली असून आजूबाजूच्या गावात सदर घटनेमुळे हळहळ व्यक्त केल्या जात आहे. "मागील तीन दिवस आधी त्याच ठिकाणी बोलेरो पिकप ने जावेद खान चांद खान राहणार नांदुरा या दुचाकी स्वारास धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला."
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List