वर्षभर पडतो येवढा पाऊस एका रात्रीत 693 मी.मीटरची नोंद पैठण तालुक्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : तालुक्यात रविवारी रात्री ते सोमवार पहाट पर्यंत दुसर्यांनदा अतिवृष्टी झाल्याने शेतातील फळ पिक व खरीपातील कपाशी, तुर, मुग, सोयाबीन पिकात पुन्हा जलमय परिस्थिती झाली. तालुक्यात वर्षभर पाऊसाची नोंद होते येवढा पाऊस एका रात्रीत म्हणजे 693 मि. मीटर पाऊस पडला असल्याची माहीती तहसील प्रशासनाने दिली. यात रविवारी रात्री ते पहाट पर्यंत पैठण मंडळातील आपेगाव सह गावात 200 मि. मिटर ईतका पाऊस पडल्याने पिकात सर्वत्र तळे साचले आहे. कातपुर येथील शेतकरी विष्णु बर्डे याच्या रोड लगत असलेल्या मोसंबी च्या शेतात रोओडच्या कामामुळे पाणी साचल्याने शेतकर्यानी साचलेल्या पाण्यात अत्महत्या करण्याता पर्यत्न करत असल्याची माहीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, पवन शिसोदे, यांना मिळताच शेतकरी बर्डे यांची भेट घेवुन मार्ग काढण्यासाठी पैठण संभाजीनगर नँशनल हावये च्या अधिकार्यानी दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने एक तास रास्ता रोको करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. परिणामी एम. आय. डी सी पोलीसानी तात्काळ भेट देवुन परवानगी शिवाय रस्ता रोको करु नका सांगुन मार्ग सुरळीत केला. तद्नतर रोड चे हायवे इंजिनीयर धनंजय दाभोळकर यांनी शेतात भेट देवुन रस्ता करूध पाणी काढण्याचे अश्वासन देवुन तात्काळ पाणी काढण्यासाठी मशिन हजर झाले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List