बदनापूर पोलिसांची मोठी कारवाई, नाकाबंदीमध्ये फरार आरोपी पकडला, वैजापूर पोलिस स्टेशन येथे दरोड्याच्या गुन्ह्यात होता फरार
आधुनिक केसरी न्यूज
सोपान कोळकर
बदनापूर : येथे दिनांक १०/१०/२०२५ रोजी पोलीस ठाणे समोर रात्री संध्याकाळी ६ ते ते ८ वाजेदरम्यान नाकाबंदी करत असताना छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेकडून माहिती मिळाली की,वैजापूर पोलीस ठाण्यामधील दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी नामे लक्ष्मण उर्फ लखन नामदेव जगताप रा. भगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर हा दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे जात आहे अशी माहिती मिळाली. बदनापूर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी लावून नमूद आरोपीस आरोपीस पकडून ताब्यात घेतले व छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई ही जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल,अप्पर पोलिस अधीक्षक आयूष नोपानी, उवविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्ग दर्शनाखाली
बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.टी.सुरवसे,
पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे, सोबत पोलीस अंमलदार अंकुश दासर
फौजदार कुंटे यांनी केली
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List