वरोड्याचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत नागपूर येथे पक्ष प्रवेश

वरोड्याचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : नगरपरिषदेचे  माजी नगराध्यक्ष, बच्चू कडू समर्थित प्रहारचे कार्यकर्ते होते. अहेतेशाम अली यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये आज ५ ऑक्टोबर रोज रविवारला नागपूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व चंद्रपूर आणि लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रहार पक्षातर्फे नुकत्याच झालेली विधानसभा निवडणूक लढविण्यापूर्वी ते भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव तसेच भाजप अल्पसंख्यक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष होते.
अहेतेशाम अली यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रहार तर्फे निवडणूक लढवीत २१००० पेक्षा जास्त मते घेऊन आपल्या जनाधाराची ओळख करुन दिली व विधानसभा क्षेत्रात आपले नेतृत्व कौशल्य सिद्ध केले. एन.एस.यु.आय., युवक काँग्रेस माध्यमातून राजकारणात आलेले अहेतेशाम अली यांनी काँग्रेसचे वरोडा शहर अध्यक्ष असतांना माजी मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्व.संजय देवतळे यांच्या सोबत २०१४ ला भाजपमध्ये त्यांनी  प्रवेश केला होता. देवतळेंचे ते समर्थक होते व गेली १० वर्षे भाजप मधे होते. ते २०१६ च्या वरोरा न.प. निवडणुकीत भाजप च्या चिन्हावर जनतेतून थेट नगराध्यक्ष म्हणून जिल्ह्यात सर्वात जास्त मतांनी निवडून आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप तर्फे उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी प्रहार  पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी,  खासदार प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन चंद्रपूर लोकसभेच्या खासदार  प्रतिभा धानोरकर यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वात अहेतेशाम अली यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकशाही वाचविण्याच्या या लढाईत सहभागी होण्याचा आपण‌निर्णय घेतला असल्याचे त्यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आज नागपूर येथील प्रेस क्लब येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व  खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश सोहळा पार पडला. या प्रसंगी आमदार विकास ठाकरे,आरीज बेग हे उपस्थित होते. 

 या पक्षप्रवेश सोहळ्यात भद्रावती भाजपा तालुकाध्यक्ष तूळश्रीराम श्रीरामे, नंदोरी सेवा सहकारी संस्थेचे संचालक दादा पाटील झाडे, राष्ट्रवादीचे जिल्हा महासचिव अशरफ खान ,सादिक अली,शाहिद अली, धर्मेंद्र हवेलीकर, माजी सरपंच अनिल खडके व मारोती झाडे, फत्तापूरचे ग्रामपंचायत सदस्य गणेश जोगी ,जयंत चंदनखेडे,, सुभाष वाटकर बोर्डा , महिला गुरुदेव सेवा मंडळ वरोड्याच्या अध्यक्ष चंद्रकला मते, जितु कांबळे ,गणेश बदकी,सुधाकर कुंकुले, लक्ष्मण नेहारे, संदीप विधाते,सुनील बिंजवे, आतिश बोरा, कादर शेख,सुनील हलमारे,पवन वरघणे, बाबू शेख, हरिशचंद्र चांभारे, इमरान शेख,पवन डांगरे नागरी,सुनील गेडाम,योगेश फुलझले केळी, वसीम शेख,रवी पवार,आदेश मेश्राम, रमेश मते,फिरोज शेख,परवेज शेख,अरविंद खोकले, साबीर शेख,लेखू केशवाणी,विजय धोपटे,विजय लांबट,पंकज शेंडे,अनिता शाह, सीमा वाकडे,राधा पर्बत, सावी भगत, निलोफर शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या प्रवेशाने वरोरा-भद्रावती तालुक्यात काँग्रेस व खासदार प्रतिभा धानोरकर यांचे हात अधिक बळकट होणार असल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बदनापूर पोलिसांची मोठी कारवाई, नाकाबंदीमध्ये फरार आरोपी पकडला, वैजापूर पोलिस स्टेशन येथे दरोड्याच्या गुन्ह्यात होता फरार बदनापूर पोलिसांची मोठी कारवाई, नाकाबंदीमध्ये फरार आरोपी पकडला, वैजापूर पोलिस स्टेशन येथे दरोड्याच्या गुन्ह्यात होता फरार
आधुनिक केसरी न्यूज सोपान कोळकर बदनापूर : येथे दिनांक १०/१०/२०२५ रोजी पोलीस ठाणे समोर रात्री संध्याकाळी ६ ते ते ८...
कटगुण गावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून
दुसरबीडमध्ये पोलीसांचा धडक छापा ; अवैध वाळू वाहतूक करणारे दोन जण ट्रॅक्टरसह रंगेहात!
मुंबईतील भूखंड लाडक्या शेठला कवडीमोल दराने देण्याचा भाजपा महायुती सरकारचा सपाटा
मतदारांची ओवाळणी कुणाला लाभदायी ठरणार..?
मृत्यूचा माझा अजून थोडा 'नकार' बाकी आहे..!
भडगाव तालुक्याचा 100% अतिवृष्टीत समावेश होईल-आमदार किशोर आप्पा  पाटील