गडचिरोली जिल्ह्यात चार नगरपरिषद सदस्य निवडणुकीला स्थगिती

गडचिरोली जिल्ह्यात चार नगरपरिषद सदस्य निवडणुकीला स्थगिती

आधुनिक केसरी न्यूज

गडचिरोली : दि. ३० राज्य निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025 च्या पत्रान्वये नगर परिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.
परंतु ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते, मात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, अशा नगर परिषदा व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी आदेशान्वये निर्देशित केले आहे. सदर सूचनेनुसार गडचिरोली नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक १अ , ४ब आणि ११ब तसेच आरमोरी नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक १०अ या चार ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असून येथील निवडणूक सुधारित कार्यक्रम नुसार घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दोन कारची समोरा-समोर धडक; एकाचा मृत्यू ९ जण जखमी,गोंदिया-तिरोडा महामार्गावरील टिकायतपूर येथील घटना दोन कारची समोरा-समोर धडक; एकाचा मृत्यू ९ जण जखमी,गोंदिया-तिरोडा महामार्गावरील टिकायतपूर येथील घटना
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : २६ जून दोन भरधाव कारची आमोरा-समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू...
अयोध्येच्या राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणारे पंतप्रधान मोदी व RSS चे ‘खास’ लोक; कारवाईचे नाटक नको, निष्पक्ष चौकशी करा : हर्षवर्धन सपकाळ
वडिगोद्रीजवळ जांभळांनी भरलेले पिकअप पलटी; रस्त्यावर विखुरलेल्या जांभळांवर नागरिकांची झडप
अखेर बहूचर्चित माजी आ.गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणाचा निकाल 
देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ
गोंदियाच्या 'आरोग्य देवदूत' राजश्री भोंडे यांच्या धाडसाने धावत्या ट्रेनमध्येच सुरक्षित प्रसूती; माता-बाळ सुखरूप
सावरगांव माळ नसिराबाद स्मार्ट सिटीचा मार्ग मोकळा; शासन लवकरच नोटिफिकेशन काढणार!