पैठण रस्त्यावरील रहदारीसाठी पर्यायी वाहतुक मार्ग

आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर : दि.६ जिमाका भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ इ छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने याठिकाणची रहदारी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दि.१८ पर्यंत ही वाहतुक याच पर्यायी मार्गाने होणार आहे.
रहदारीतील बदल याप्रमाणे-  १.कचनेर-निजलगाव-बिडकीन डीएमआयसी- निजलगाव फाटा,  बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने कचनेर- निजलगाव- बिडकीन डीएमआयसी एन्ड्युरन्स कंपनीजवळून- शेकटा फाटा- बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाईल. २.  छत्रपती संभाजीनगर- निजलगाव फाटा- बिडकीन- निजलगाव फाटा- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव मार्गे कचनेरकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर-निजलगाव फाटा-बिडकीन –शेकटा फाटा- एन्ड्युरन्स कंपनी जवळून- बिडकीन डीएमआयसी – निजलगाव मार्गे कचनेरकडे जातील.
३. वाळूज- शेंदुरवादा- शेकटा- शेकटा फाटा- बिडकीन- निजलगाव फाटा- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव मार्गे कचनेरकडे जाणारी वाहने; वाळूज- शेंदुरवादा- शेकटा- शेकटा फाटा- एनड्युरन्स कंपनी जवळून- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव मार्गे कचनेरकडे जातील. ४.कचनेर- निजलगाव-बिडकीन डीएमआयसी- निजलगाव फाटा- बिडकीन- शेकटा फाटा- शेकटा- शेंदुरवादा मार्गे वाळूज कडे जाणारी वाहने; कचनेर- निजलगाव- बिडकीन डीएमआयसी- एनड्युरन्स कंपनी जवळून- शेकटा फाटा- शेकटा- शेंदुरवादा मार्गे वाळूजकडे जातील. दि.१८ पर्यंत हे बदल लागू राहतील. प्रतिबंधीत केलेल्या मार्गावर वाहनांची ये- जा बंद करण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप
आधुनिक केसरी न्यूज  बिलोली : देगलूर–बोधन मार्गावर सगरोळी येथे भरधाव व ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या हायव्याने एका व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक...
बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी
‘NEET’ पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात तीव्र आंदोलन
प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी
अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी 
साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई