मोठी बातमी : अनुकंपाचा अनुशेष संपणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

4 ऑक्टोबरला 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार, यातील 5187 अनुकंपा उमेदवारांना

मोठी बातमी : अनुकंपाचा अनुशेष संपणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : १ ऑक्टोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी 5122 एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून, एकाचदिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा हा इतिहासातील एक अनोखा कार्यक्रम ठरेल.

शासकीय नोकरीत असताना कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण, कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागते. अशात या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतिक्षायादीतील 5187 अनुकंपा उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे. 4 ऑक्टोबरला मुख्य कार्यक्रम हा मुंबईत होईल आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील, तर पालकमंत्री आपआपल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्रे वितरित करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी 100 दिवस आणि नंतर 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा होता. यासोबतच एमपीएससीतर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या लिपीक-टायपिस्ट श्रेणीतील 5122 उमेदवारांना सुद्धा नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. एकूण 10,309 उमेदवारांपैकी सर्वाधिक 3078 उमेदवार हे कोकण विभागातील असून, 2597 हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात 1674, नाशिक विभागात 1250, तर मराठवाड्यातील 1710 उमेदवार आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

कवलापूर येथील विमानतळ प्रश्नी शासन अनुकूल; उद्योगमंत्री उदय सामंत; मुंबई मध्ये ना सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न कवलापूर येथील विमानतळ प्रश्नी शासन अनुकूल; उद्योगमंत्री उदय सामंत; मुंबई मध्ये ना सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
आधुनिक केसरी न्यूज  सुधीर गोखले  कवलापूर : येथील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा प्रस्तावित विमानतळ प्रश्नी काल मुंबई येथे मंत्रालयामध्ये उद्योगमंत्री...
रा. स्व. संघाला १०० वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम: हर्षवर्धन सपकाळ
मराठ मोळ्या आपली एसटी ॲप द्वारेआता एसटीचा ठावठिकाणा कळणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 
मोठी बातमी : अनुकंपाचा अनुशेष संपणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
कायद्याचे उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रणितची लंडन वारी
दोन ग्राम महसूल अधिकारी २० हजाराची लाच स्वीकारतांना अटक ; अॅन्टी करप्शन ब्युरोची धडक कारवाई..! 
अकोला येथील भुयारी गटात पाहून गेलेला इसमाचा मृतदेह सापडला