कवलापूर येथील विमानतळ प्रश्नी शासन अनुकूल; उद्योगमंत्री उदय सामंत; मुंबई मध्ये ना सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
आधुनिक केसरी न्यूज
सुधीर गोखले
कवलापूर : येथील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा प्रस्तावित विमानतळ प्रश्नी काल मुंबई येथे मंत्रालयामध्ये उद्योगमंत्री ना उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक संपन्न झाली. यावेळी ना उदय सामंत यांनी व्हिजिबिलिटी अहवालाच्या आधारे कवलापूर येथे विमानतळ उभारणीची योजना शक्य असल्याचे म्हणले आहे तर विमानतळ प्राधिकरणाने तातडीने कवलापूर येथे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत या मुळे भविष्यात कवलापूर मध्येकार्गो आणि नागरी उड्डाणे सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या कित्तेक दशकापासून कवलापूर विमानतळ प्रश्न ऐरणीचा मुद्दा ठरला होता यासाठी विविध संघटनांनी आंदोलने केली होती. बुधवारी या विषयावर बैठक संपन्न झाली या बैठकीला ना चंद्रकांत पाटील, माजी पालकमंत्री आणि मिरज विधानसभेचे आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे, खासदार विशाल पाटील, माजी राज्यमंत्री आणि आमदार डॉ विश्वजित कदम, आमदार सुहास बाबर, दृक् श्राव्य माध्यमातून सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी ना उदय सामंत यांनी या ठिकाणी कदाचित अतिरिक्त जमीन अधिग्रहित करावी लागल्यास शासन ती अधिग्रहित करेल लवकरच या ठिकाणी सर्वेक्षण होईल आणि त्याचा अहवाल आल्यावर आम्ही कारवाई सुरु करू असे स्पष्ट केले या बैठकीच्या निमित्ताने आता जिल्ह्यातील उद्योजकांना आणि नागरिकांना भविष्यामध्ये कवलापूर मधून हवाई उड्डाण करता येणे शक्य होईल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List