मराठ मोळ्या आपली एसटी ॲप द्वारेआता एसटीचा ठावठिकाणा कळणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आधुनिक केसरी न्यूज
रत्नपाल जाधव
मुंबई : (२ ऑक्टोबर) वाट पाहिन पण एसटी नेच जाईन अशा थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना आता एसटीचा अचुक ठावठीकाणा कळणार आहे तोही मराठमोळ्या आपली एसटी या ॲप द्वारे दसऱ्याच्या मुहूर्ता वर या ॲप चे लोकार्पण होत आहे .१२ हजार पेक्षा जास्त बसेस व राज्यभरातील १ लाख पेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित केले आहे.
भविष्यात लाखो प्रवासी याचा वापर करणार असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण होऊ शकतात तसेच झाल्यास, प्रवाशांनी त्या जरूर सुचित कराव्यात ,असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. जेणेकरून एक परिपूर्ण ॲप विकसित करण्यास मदत होईल ‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.’ या कंपनीच्या सहाय्याने विकसित केलेल्या " आपली एसटी "(Aapli ST) ॲपमुळे प्रवासी आपल्या जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळवू शकणार असून
प्रवासी माहिती केंद्राद्वारे (‘Passenger Information System’ ) बस कुठून सुटणार (STD) आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार (ETA) याची वस्तुस्थिती जन्य (रिअल-टाइम) माहिती मिळेल. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर थांबून वेळ घालवण्याची गरज नाही, तर ते थेट बस उपलब्धतेनुसार थांब्यावर पोहोचू शकतील.ॲपमध्ये अँड्रॉइड आणि ॲपल वापरकर्त्यांसाठी अनेक उपयुक्त सुविधा (फीचर्स )उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यात प्रवाशांना आपल्या जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे, दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती पाहणे, आरक्षण केलेल्या तिकीटातील बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक टाकून बसची थेट मागोवा (लाईव्ह ट्रॅकिंग करणे) घेणे, यांचा समावेश आहे.
याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ॲपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी देखील देण्यात आली असून, एकाच क्लिकमध्ये कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर कॉल करता येणार आहे.सध्या या ॲपवर राज्यातील तब्बल १२,००० हून अधिक बसेसचे लाईव्ह डेटा उपलब्ध आहे. भविष्यात सर्व बसेस या ॲपच्या कार्यकक्षेत येतील. पुढे प्रवाशांच्या अभिप्रायाच्या आधारे ॲपमध्ये आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत. तसेच लवकरच एसटीचे (MSRTC ) सध्या असलेल्या...तिकिट बुकिंग ॲपमध्येही बसची थेट माहिती (Live Data) समाविष्ट केली जाणार आहे, ज्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाही मोठी सुविधा मिळेल.
एसटीचा उद्देश प्रवाशांना अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याचा असून, आपली एसटी (Aapli ST) ॲप या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. तसेच महामंडळाने याबाबत प्रवाशांकडून सूचना व अभिप्राय मागवुन , त्यांच्या अपेक्षेनुसार ॲपमध्ये सतत सुधारणा कराव्यात अशी सूचना त्यांनी केली आहे. सध्या हे ॲप MSRTC commuter app या नावाने प्ले स्टोअर मधून प्रवाशांना डाऊनलोड करून घेता येईल.तथापि, आपली एसटी (Aapli ST) हे नाव लवकरच प्ले स्टोअर मध्ये दिसू लागेल.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List