दोन ग्राम महसूल अधिकारी २० हजाराची लाच स्वीकारतांना अटक ; अॅन्टी करप्शन ब्युरोची धडक कारवाई..!
आधुनिक केसरी न्यूज
दिपक सुरोसे
शेगाव : दि.३० गौण खनीज वाहतूक करणारे पकडण्यात आलेले तीन खाली कार्यवाही न करता वाहने सोडून द्यायचे असेल तर तुम्ही मला ५०,०००/- रूपये द्या अशी लाच रकमेची मागणी
केली असता यातील उर्वरित २० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना सगोडा येथील तलाठी (ग्राम महसुल वर्ग १,अधिकारी श्री. अरूण गुलाबसिंग डाबेराव,व मटरगाव येथील तलाठी अमोल सोपान गिते यांना अँटी क्ररप्शन ब्युरो घटक, अकोला यांनी रंगे हात पकडल्याची घटना दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी जगदंगा चौक शेगाव येथील तलाठी कार्यालय येथे घडली.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील तक्रारदार यांचा चुलत भाऊ यांची एक जेसीबी आणि एक टिप्पर तसेच इतर नातेवाईकांचे एक टिप्पर असे नमुद तिन्ही वाहनाने रेती / माती / मुरूम वाहतुक करीत असतात. दिनांक १० / ०९ / २०२५ रोजी श्री. डाबेराव, तलाठी, ग्राम माटरंगाव यांनी सदरचे खाली वाहन पकडुन तिन्ही वाहन अवैध मुरूम
उत्खनन करण्याकरीता जात असल्यामुळे मी त्यांचेवर कायदेशिर कार्यवाही करून सदर वाहने हे तहसिल कार्यालय, शेगांव येथे लावतो असे सांगीतले जर कार्यवाही न करता वाहने सोडून द्यायचे असेल तर तुम्ही मला ५०,०००/- रूपये द्या अशी लाच रकमेची मागणी केल्याने त्यावेळी त्यांनी १९,००० /- रूपये दिले व उर्वरीत ३१,०००/- रूपये सकाळी आणुन देतो.
असे सांगीतले. परंतु तक्रारदारास गैरअर्जदार यांनी मागणी केलेली उर्वरीत लाच रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी दिनांक ११/०९/२०२५ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय अकोला येथे तक्रार नोंदवीली.तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १२/०९/२०२५ रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी कार्यवाही आजमाविली असता, आरोपी क्र. १ श्री. अरूण डाबेराव यांनी तडजोडीअंति २०,००० /- रूपये लाच रकमेची मागणी करून सदरची लाच रक्कम ही आरोपी क्र. २ श्री. अमोल गिते तलाठी यांची असल्याचे सांगीतले. त्यावरून दिनांक २२/०९/२०२५ रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी कार्यवाही आजमाविली असता, आरोपी क्र. २ श्री. अमोल गिते तलाठी यांनी तक्रारदार यांना आरोपी क्र. १ श्री. डाबेराव, तलाठी यांनी तक्रारदार यांचेकडे मागणी केलेल्या लाच रकमेस दुजोरा देवून सदरची लाच रक्कम "आणली असल्यास देवून टाका" असे बोलून लाच रकमेची मागणी करून ती लाच रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु दिनांक २२/०९/२०२५ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी क्र. १ श्री. डाबेराव यांनी सदरची लाच रक्कम स्विकारण्यास टाळाटाळ केली. सदर कार्यवाही दरम्यान आरोपींना तक्रारदार यांचे हालचालीवर संशय निर्माण झाल्याने त्यांचेकडे मागणी केलेली लाच रक्कम स्विकारण्यास टाळाटाळ करीत असल्याचे तक्रारदार यांनी सांगीतल्याने आज दिनांक ३०/०९/२०२५ रोजी आरोपी अरुण डाबेराव सावता चौक, जुने महादेवाच्या मंदीराजवळ, शेगाव, . अमोल सोपान गिते, वय ३६ वर्ष पद तलाठी (ग्राम महसुल अधिकारी), तलाठी कार्यालय आळसना अतिरीक्त कार्यभार बेलुरा, ता. शेगाव जि. बुलढाणा, वर्ग ३, रा. अकोट रोड, गिते मळा, ता. शेगाव यांना ताब्यात घेवुन आरोपींविरूध्द पोलीस स्टेशन शेगाव शहर, जि. बुलढाणा येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलमन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई श्री. मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र अमरावती, श्री. सचिंद्र
शिंदे अपर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र अमरावती, श्री. मिलींदकुमार अ. बहाकर, पोलीस उप
अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो अकोला यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रविण वेरूळकर पोलीस निरीक्षक, पोलीस हवा. डिगांबर
जाधव, पोअं. निलेश शेगोकार, असलम शहा, गोपाल किरडे, शालु हंबर्डे आणि चालक पो. अंम. सलीम खान यांनी केली
आहे.
तरी सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येते कि कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी अथवा त्यांच्यावतीने कोणत्याही खाजगी इसमाने त्यांचे कोणतही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अॅन्टी करप्शन ब्युरो अकोला येथील ऑफिस फोन नं. ०७२४- २४१५३७०, ९४०३८०१०६४,टोल फ्रि क्रं. १०६४ या क्रमांवर संपर्क साधावा.असे आवाहन प्रविण वेरूळकर,पोलीस निरीक्षक,अॅन्टी करप्शन ब्युरो, अकोला यांनी केले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List