कायद्याचे उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रणितची लंडन वारी

कायद्याचे उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रणितची लंडन वारी

आधुनिक केसरी न्यूज

राजरत्न भोजने

शेगांव : डॉ. बाबासाहेबांना आदर्श मानून शिक्षणाचे महत्व समजून प्रणित हिंमत भोजने एलएलएम कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आता लंडनला गेला आहे. २६ वर्षाचा प्रणित, बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातल्या वरुड ह्या छोट्याश्या खेड्यातला तरुण. दहावीपर्यंत जिल्हा परिषद मराठी माध्यमातूनच शिक्षण पूर्ण केलं, छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयातून बीएससी झाला, तर व्हीएन पाटील लॉ कॉलेजमधून एलएलबी पदवी यशस्वी संपादन केली. ज्ञानाच्या जोरावर प्रणितची जगात मानल्या जाणाऱ्या ब्रिस्टॉल युनिव्हरसिटी मध्ये एलएलएम, ह्यूमन राईट्स लॉ कायद्याचे उच्चशिक्षण घेण्यासाठी लंडनला निवड झाली आहे.

आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने प्रणितने हॉटेल मध्ये सहावर्षे रात्रपाळीत काम करत शिक्षण पूर्ण केले. तटपुंज्या पगारावर भावंडाचाही शिक्षणाचा पाया रोवला. प्रणित वयाच्या बाराव्या वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे, पुढे छत्रपती संभाजीनगर येथे बहुजन विद्यार्थी  आघाडी संघटनेचा जिल्हाध्यक्ष झाला, आंदोलने करून हजारो विद्यार्थांच्या समस्या सोडवत त्यांना न्याय मिळवून दिला.

प्रणित उच्चशिक्षणासाठी दि.२३ रोजी रवाना होणार असल्याची वार्ता पंचकृषीत पसरली, तेव्हा गावाचा आणि  परिवाराचा आनंद गगनात मावेनासा होता. प्रणित लंडन येथे रवाना होताना त्याला निरोप देण्यासाठी भोजने परिवाराच्या डोळ्यात आनंदाअश्रू होते. मोठ्या  हर्षउल्हासात गावाकऱ्यांनी मिरवणूक काढत प्रणितला निरोप दिला, व त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर  : ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने, एकजुटीने आणि सकारात्मकतेने लढलो. आमच्याकडे ठोस विकासकामांचा अजेंडा होता आणि...
चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार
बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण
भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका