अकोला येथील भुयारी गटात पाहून गेलेला इसमाचा मृतदेह सापडला
आधुनिक केसरी न्यूज
सागर झनके
मानेगाव : 27 सप्टेंबर रोजी देशमुख फैल अकोला येथील सोनू कन्नू करोसिया ( वय ४१ ) शहरातील कॉटन मार्केट चौकातील व्हेरी गटार नाल्यात वाहून गेल्याची माहिती अकोला शहर पोलिसांना मिळाली .सलग तीन दिवस अकोला पोलीस आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर इसमाचा शोध घेतला परंतु वाहून गेलेला इसम आढळून आला नाही. भुयारी गटात शोध मोहीम राबवणे अतिशय कठीण व जिकरीचे असताना दीपक सदाफळे व त्यांच्या टीमने वाहून गेलेल्या इसमाला शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु त्यांना यश मिळाले नाही. अखेर घटनास्थळावरून 120 किलोमीटर अंतरावर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव जवळील नदीपात्रात सकाळी नऊ वाजता सदर इसमाचा मृतदेह शोधण्यात यश आले. जळगाव जामोद पोलिसांनी सदर इसमाचे प्रेत ताब्यात घेतले असून इसमाची ओळख पटली आहे. यावेळी जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या पी.एस.आय स्नेहा शेंडगे मॅडम, हेड कॉन्स्टेबल अक्षय चाटे होमगार्ड सागर मानकर हजर होते. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे संदीप साबळे यांनी दिली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List