मेंढरांच्या तळावर बिबट्याचा हल्ला १ शेळी ठार

मेंढरांच्या तळावर बिबट्याचा हल्ला १ शेळी ठार

आधुनिक केसरी न्यूज 

ईश्वरपुर : बिबट्याने सोमवारी मध्यरात्री  मेंढरांच्या तळावर केलेल्या हल्ल्यात मोहन गावडे रा. आष्टा, या मेंढपाळांची १ शेळी ठार झाली. या घटनेनंतर मेंढपाळ शेतकरी यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून मेंढपाळाचे सुमारे २० हजाराचे नुकसान झाले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि मेंढपाळ अनिल बाबासो गावडे, अनिल मोहन गावडे, संभाजी शिवाजी गावडे, बापूसो दादू गावडे, अनिकेत आनंद ढोले रा. आष्टा, जिल्हा सांगली या सर्व मेंढपाळांचा सुमारे पाचशे शेळ्या मेंढ्याचा तळ शांतिनाथ मल्लाप्पा लांडे यांच्या ( गट क्रमांक ५३९ .२ ) दुधगाव रोड काळा वडा येथील शेतात महिनाभरापासून खतासाठी बसायला आहे. मंगळवार दि.८  रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास मेंढरा साठी लावलेल्या जाळी ( वाघर) वरून बिबट्याने मेंढरांच्या कळपात  झेप घेतली व शेळीस पकडले व  वाघर पाडून ओढू लागला. परंतु शेळी बांधून ठेवलेली असल्यामुळे बिबट्याला घेऊन जाता आले नाही. बिबट्याच्या आणि मेंढरांच्या आवाजाने मेंढपाळ जागे झाले.  मेंढपाळांनी केलेल्या आरडाओरडीने  बिबट्याने शेळी सोडून ऊसात धूम ठोकली. परंतु तळाजवळ थोड्या अंतरावर मेंढपाळांना बॅटरीच्या उजेडात दोन बिबटे दिसले. शेवटी मेंढपाळांनी घाबरून आपल्या शेळ्या मेंढ्यांना घेऊन मध्यरात्री  घरी आले.  या घटनेची माहिती मेंढपाळ अनिल मोहन गावडे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना तातडीने दिली. संजय वाघमोडे यांनी  मेंढपाळांना धीर देऊन तातडीने ही घटना वनरक्षक भिवा कोळेकर यांना कळवून  घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली. स्वत:त अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. 

घटनास्थळी  वनपाल बर्गे साहेब, वनरक्षक भिवा कोळेकर, प्रथमेश कोळी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. डॉ. वाटेगावकर पशुवैद्यकीय अधिकारी आष्टा, यांनी मृत मेंढीचा पंचनामा केला.   
 यावेळी बोलताना संजय वाघमोडे म्हणाले कि वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. व बिबट्या तरस या सारख्या वन्य प्राण्यांनी जंगलातील आश्रय स्थान सोडून सहज मिळणाऱ्या भटकी कुत्री, कोंबड्या, शेळ्या मेंढ्याची शिकार यामुळे या प्राण्यांणी आपले आश्रय स्थान ऊसाच्या शेतात निर्माण केले आहे. कृपया शेतकरी मेंढपाळांनी आपल्या रानातील जनावरे बंदिस्त अथवा निगराणीत ठेवावीत. तसेच वनविभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा. तसेच वन्यप्राण्याची भिती व नागरिकामधील कमी करण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती करावी. अनिल गावडे, भीमराव गावडे, तानाजी टकले, दाजी गावडे अनिल मोहन गावडे यांच्यासह मेंढपाळ उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मेंढरांच्या तळावर बिबट्याचा हल्ला १ शेळी ठार मेंढरांच्या तळावर बिबट्याचा हल्ला १ शेळी ठार
आधुनिक केसरी न्यूज  ईश्वरपुर : बिबट्याने सोमवारी मध्यरात्री  मेंढरांच्या तळावर केलेल्या हल्ल्यात मोहन गावडे रा. आष्टा, या मेंढपाळांची १ शेळी...
नवीन वीज जोडणीसाठी ५ हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमन जाळ्यात
कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मामा-भाचीचा जागीच दुर्दैवी मृत्यू!
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; मध्यरात्रीपासून उपचार सुरू
गोंदिया - बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू, 7 गंभीर
कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ करा : न्यायमूर्ती संदीप शिंदे
पळसवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; शेळीवर हल्ला करून ठार