गोंदिया - बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू, 7 गंभीर
आधुनिक केसरी न्यूज
गोंदिया : गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा - मोहरानटोली येथे ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील सहा जणांचा जागीच मृत्यू, तर सात जण जखमी झाले आहेत. अपघातातील सर्वजण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मजुरीच्या कामानिमित्त हैदराबादकडे निघालेल्या मजुरांच्या पिकअप वाहनाला नागरा- मोहरानटोली परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.
गोंदिया-बालाघाट मार्गावर भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत आरुष मात्रे, किरण संतोष वैद्य, संतोष मात्रे, सुशिला मात्रे, रुपसेन सत्यकर आणि ज्योती सत्यकर यांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील विविध भागांतील रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List