श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाख रुपयांची मदत
आधुनिक केसरी न्यूज
शिर्डी : दि. ७ सप्टेंबर २०२६ श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी येथे कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक, शाखा श्रीरामपूर यांच्या माध्यमातून प्रत्येकी रु. १० लाखांची जनता अपघात विमा पॉलिसी घेण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत श्री साईबाबा हॉस्पिटलमधील कायम कर्मचारी श्री बाबूराव गणपत राऊत यांना अपघात विम्यापोटी रु. ३,५०,०००/- इतक्या रकमेची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. श्री बाबूराव गणपत राऊत यांचा दि. २६ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या केलवड येथील राहत्या घरी अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या हाताच्या पंजाचा काही भाग निकामी झाला. संस्थानने सर्व कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या अपघात विमा पॉलिसीमुळे त्यांना विमा दाव्याचा लाभ मिळाला.
या विमा दाव्याचा रु. ३,५०,०००/- रकमेचा धनादेश दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीमती प्रिती अग्रवाल (IPoS), पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्याकडे सुपूर्द केला.
याप्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री संदीपकुमार भोसले, मुख्य लेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, प्रभारी कामगार अधिकारी श्री शरद डोखे उपस्थित होते. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या वतीने श्री राजेंद्र आघाव (मुख्य व्यवस्थापक, आयपीपीबी पुणे विभाग), श्री अविनाश फाकरे (एपीएमजी, पुणे विभाग), श्री उमेश जनवडे (पोस्ट अधीक्षक, श्रीरामपूर), श्री काशीविश्वनाथ जी (आयपीपीबी शाखा व्यवस्थापक, श्रीरामपूर) तसेच श्री अनंत कुमार (राष्ट्रीय प्रमुख, आदित्य बिर्ला विमा) उपस्थित होते. संस्थानने कर्मचाऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेसाठी राबविलेल्या अपघात विमा योजनेमुळे संकटाच्या प्रसंगी कर्मचाऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळत असून, ही योजना कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आधार ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List