भोकरला भूमाफीयांच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या मयताच्या आईने दिली तक्रार
आधुनिक केसरी न्यूज
भोकर : येथील तहसील कार्यालयासमोर असलेल्या हॉटेल कणका भवनचे मालक व्यंकटेश सायागौड भुरेवार (वय ५३ ) यांनी भूमाफियांच्या जाचाला कंटाळून गोवर्धन घाट नांदेड येथे गुरुवारी ( ता. चार)गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. मयताच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली असली तरी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या मुलाकडे मागील ७० वर्षापासून सदर इमारत असून त्या ठिकाणी कणका भवन बार सुरू आहे. सदर इमारत नगर परिषदेला नमुना क्रमांक ४३ ला नोंद आहे. पी आर कार्ड देखील आहे, मागील महिना भरापासून येथील मोहम्मद हारून मोहम्मद युसुफ, रमीजोदिन तकियोदिन इनामदार, शिजुखान सादत खान, अहमदखान अल्लारखान इनामदार, अजबाज खान फतेखान या सर्व जणांनी मिळून ही जागा आमची आहे इनामी आहे तू इथून निघून जा, दुकान खाली कर नाहीतर जागा विकून जा असे म्हणत होते. माझ्या मुलास धमकी देऊन मानसिक त्रास दिला व ३ कोटीची जागा (१ कोटी दहा लाख रुपयांमध्ये) दबाव टाकून धोक्याने सौदा चिट्ठी करून घेतली. तेव्हापासून माझा मुलगा मानसिक त्रासामध्ये होता माझ्या मुलाला सतत धमकी देत होते. या जाचाला कंटाळून माझ्या मुलाने शनिवारी (ता पाच) रोजी गोवर्धन घाट नांदेड येथे गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. वरील आरोपीने माझ्या मुलाला मानसिक त्रास देऊन धमक्या दिल्यामुळेच माझ्या मुलाने आत्महत्या केली आहे. आरोपी विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार मयताची आई सत्यअक्का सायागौड भुरेवार, व येथील गौड व्यंकटेश भुरेवार यांनी भोकर पोलिसात केली आहे. भोकर पोलिसात मात्र याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
भोकर मध्ये इनामी जमीन घोटाळा
शहरात इनामी जमीन मोठ्या प्रमाणात आहे.सदर जमीन विक्री खरेदी करता येत नाही मात्र शहरात अनेक ठिकाणी जमीन विक्री करून रजिस्ट्री करून नगरपालिकेला नोंद करून अनधिकृत रित्या कारभार करण्यात आला. प्रकरणाची चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येऊ शकतो.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List