बदनापूर पोलिसांची धडक कारवाई, १ लाख ८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
आधुनिक केसरी न्यूज
बदनापूर : गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दाभाडी येथील जुबेर अक्तरमिया बागबान याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरात प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून विक्री सुरू केली आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी त्याच्या घरावर छापा टाकला असता १,०८,९६४ रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा मिळून आला. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
त्याचबरोबर गेल्या आठवड्यात देखील बदनापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. दाभाडी ते चिखली रोडवरील लालजी ढाबा परिसरात पिक-अप वाहनातून अवैध देशी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ३१ ऑगस्ट रोजी रात्री छापा टाकला असता पिक-अप वाहनात ६ बॉक्स देशी दारू आढळली. यामध्ये २५,९२० रुपयांची दारू आणि ५ लाख रुपये किंमतीचे पिक-अप वाहन असा एकूण ५,२५,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मयूर जैस्वाल रा. रामनगर जालना आणि सतीश भिकाजी दांडाईत रा. सोमनाथ जळगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाया पोलीस अधीक्षक तेगबिर सिंह संधु, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे, पोउपनि अजय जैस्वाल, पोहेकॉ मतीन शेख, सपोनि सुभाष चव्हाण, ग्रेड पो.उपनिरीक्षक संतोष सावंत, पोकॉ एस.जे. तडवी, पोकॉ पूनमसिंग गोलवाल, पोकॉ रतन गोरे, पोकॉ अनिल पिलेवाड, महिला पोलीस प्रीती जाधव, चालक राम सानप यांनी केल्या आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List