मोक्कातील ‘मुक्या’ अखेर एलसीबीच्या जाळ्यात!

सांगली एल सी बी च्या पथकाने आवळाल्या मुसक्या ६ लाखांचे सोने जप्त

मोक्कातील ‘मुक्या’ अखेर एलसीबीच्या जाळ्यात!

आधुनिक केसरी न्यूज 

सांगली : दरोडा, खून, जबरी चोरी आणि घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यांनी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत दहशत निर्माण करणारा आणि वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ ‘मुक्या’ भिमराव पवार (३५, रा. बहादुरवाडी, ता. वाळवा) अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) जाळ्यात अडकला. त्याच्याकडून ६ लाख २ हजार ७६० रुपये किमतीचे ४० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पथक आष्टा परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार संकेत कानडे, अभिजीत माळकर, ऋषीकेश सदामते व विनायक सनदी यांना मुक्या पवार आष्टा-नागाव रस्त्यावरील सह्याद्री मल्टीपर्पज लॉन्ससमोर चोरीचे सोने विकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला चारही बाजूंनी घेरले. अंगझडतीत दोन नक्षीदार सोन्याच्या बांगड्या सापडल्या.

चौकशीत पवारने साथीदारांसह मर्दवाडी येथे कौलारू घराची कौले काढून तिजोरी फोडल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या घरफोडीत वाटणीला आलेले सोने विकण्यासाठी तो आला होता. मुक्या पवारविरुद्ध आष्टा, पलूस, कुरळप व कुंडल पोलीस ठाण्यांत सात गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्यावर यापूर्वी दोन वेळा ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झाली आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अजितदादांच्या जाण्याचं दुःख किती आहे हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार; अजितदादांच्या अपघाताचे राजकारण कुणी करु नका - सुनेत्रा पवार अजितदादांच्या जाण्याचं दुःख किती आहे हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार; अजितदादांच्या अपघाताचे राजकारण कुणी करु नका - सुनेत्रा पवार
आधुनिक केसरी न्यूज  पुणे : दि. ३ सप्टेंबर - आदरणीय अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात जी पोकळी निर्माण झाली आहे ती...
मोक्कातील ‘मुक्या’ अखेर एलसीबीच्या जाळ्यात!
सांगली-तासगाव-बारामती महामार्गावरील प्रश्न तातडीने सोडवा - माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, नगरसेवक हर्षवर्धन पाटील  जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडे मागणी
आश्चर्य दुष्काळातही भगवानगडाच्या पायथ्याशी विहीर तुडुंब!
राजूर येथे मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन:मराठा समाज आक्रमक,बाजारपेठ कडकडीत बंद
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लोहा कडकडीत बंद!
सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप; अहेरी-नागेपल्ली परिसरातही जाणवले सौम्य धक्के