सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप; अहेरी-नागेपल्ली परिसरातही जाणवले सौम्य धक्के

सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप; अहेरी-नागेपल्ली परिसरातही जाणवले सौम्य धक्के

आधुनिक केसरी न्यूज 

गडचिरोली : दि. ३ सप्टेंबर (जिमाका) : गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.  दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून त्याचे केंद्र गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे प्राथमिक माहितीत दर्शविण्यात आले आहे.अहेरी तालुक्यातील अहेरी व नागेपल्ली परिसरातही हे धक्के जाणवल्याची माहिती अहेरी तहसील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती प्राप्त झालेली नाही. नागरिकांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे घाबरून जाऊ नये. शांतता राखून आवश्यक ती दक्षता बाळगावी. तसेच भूकंपासंदर्भातील अफवा अथवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप; अहेरी-नागेपल्ली परिसरातही जाणवले सौम्य धक्के सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप; अहेरी-नागेपल्ली परिसरातही जाणवले सौम्य धक्के
आधुनिक केसरी न्यूज  गडचिरोली : दि. ३ सप्टेंबर (जिमाका) : गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.  दि. ३...
प्रसाद लाड यांची शिष्टाई फळाला; जरांगेंनी सरकारला दिला दोन दिवसांचा वेळ
समृद्धी महामार्गावरील सोनसाखळी लूट टोळीचा पर्दाफाश; पाच आरोपी जेरबंद
किनवटचे पोलीस निरीक्षक गणेश कराडची नांदेडला तडकाफडकी बदली 
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी बीडच्या विकासाला नवी गती;१७ सप्टेंबरला रेल्वेची पुण्याशी तर डिसेंबरमध्ये मुंबईशी जोडणी
‘जीआर काढा अन् माझ्याकडे या; त्यात काय चूक आहे ते आम्ही सांगू! सरकारला जरांगे पाटलांचे थेट आव्हान
टेम्पोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार ठार