टेम्पोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार ठार
On
आधुनिक केसरी न्यूज
वैजापूर : तालुक्यातील शिवराई येथे टेम्पोने दुचाकीस्वाराला जोरदार धडक देऊन चाकाखाली चिरडल्याची भीषण घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर उर्फ गणेश सर्जेराव पठाडे (वय २५, रा. शिवराई) असे मृत तरुणाचे नाव आहे. गणेश हा सोमवारी सकाळी दुचाकीवरून शिवराई येथून पारसोडा रस्त्याने जात होता. याचदरम्यान टेम्पोने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर गणेश रस्त्यावर कोसळला आणि टेम्पोचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे शिवराई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
02 Sep 2026 15:14:54
आधुनिक केसरी न्यूज वैजापूर : तालुक्यातील शिवराई येथे टेम्पोने दुचाकीस्वाराला जोरदार धडक देऊन चाकाखाली चिरडल्याची भीषण घटना सोमवारी सकाळी ११...

Comment List