वर्धा पोलीस मुख्यालयातील 'शस्त्र गोळीबार प्रशिक्षण' यशस्वी; अंमलदार संभाजी मुंढकर यांचा गौरव
आधुनिक केसरी न्यूज
माणिक सुर्यवंशी
देगलूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, आणीबाणीच्या प्रसंगी अचूक निर्णयक्षमता दाखवणे आणि जवानांची शस्त्र हाताळणी क्षमता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित तीन दिवसीय 'शस्त्र हाताळणी व गोळीबार प्रशिक्षण सन २०२६' यशस्वीरीत्या पार पडले. या विशेष प्रशिक्षण सत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल समुद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी मुंढकर (बक्कल क्र. १६४९) यांना पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
आयोजक : वर्धा जिल्हा पोलीस दल
ऑगस्ट २०२६प्रशिक्षण सत्र : सत्र क्रमांक१५
प्रशिक्षण स्थळ : जिल्हा पोलीस मुख्यालय, वर्धा
सन्मानित अंमलदार : संभाजी मुंढकर (PC 1649, पोलीस स्टेशन समुद्रपूर)
प्रशिक्षणाचे महत्त्व व स्वरूप : पोलीस दलातील अंमलदारांची शारीरिक व मानसिक सज्जता वाढवण्यासाठी नियमितपणे अशा प्रकारच्या उजळणी वर्गांचे आयोजन केले जाते. या शिबिरात आधुनिक शस्त्रास्त्रांचे तांत्रिक ज्ञान, गोळीबाराचा अचूक सराव, संकटकालीन परिस्थितीत शस्त्र सुरक्षितपणे हाताळणे आणि देखभाल करणे यांसंदर्भात तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. सत्र क्र. १५ मधील सर्व निकष यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल (भा.पो.से.) यांनी संभाजी मुंढकर यांचे कौतुक करत त्यांना प्रशस्तीपत्र बहाल केले. या यशाबद्दल समुद्रपूर पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार तसेच सहकाऱ्यांकडून मुंढकर यांचे अभिनंदन होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List