किनवटचे पोलीस निरीक्षक गणेश कराडची नांदेडला तडकाफडकी बदली 

किनवटचे पोलीस निरीक्षक गणेश कराडची नांदेडला तडकाफडकी बदली 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृहातील आदिवासी महिलेच्या छेडखानी प्रकरणी गुन्हा नोंदविण्यास विलंब करणाऱ्या किनवटचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नांदेड येथे तडकाफडकी बदली केली असून त्यांचे जागेवर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांना पाठविण्यात आले आहे. तेलंगणातील पोलीस शेख जाफरला किनवट येथून अटक करून घेऊन जात असताना चिखली फाटा येथे आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर हल्ला करून आरोपीला हातकडी सह पळून नेले होते. तेही प्रकरण गणेश कराड यांच्या अंगलट आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे .परंतु तेलंगणा पोलिसांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला होता .त्यामुळे किनवट पोलिसांची प्रतिमा मलीन झाली होती. दिनांक 20 ऑगस्ट रोजी किनवटच्या गोकुंदा येथील शासकीय  विश्रामगृहात विधवा महिलेवर बालाजी केंद्रे यांनी अत्याचार करण्याचा दोन दिवस प्रयत्न केल्याच्या कारणाने   संबंधित महिला  तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली असता तिची तक्रार घेण्यास पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी  टाळाटाळ केली होती .परंतु किनवटचे आमदार केराम यांच्या दबावामुळे त्यांना विलंबाने का होईना गुन्हा नोंदवावा लागला होता. या दोन्ही घटनांमुळेच गणेश कराड यांची किनवट वरून नांदेडला नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली झाली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

समृद्धी महामार्गावरील सोनसाखळी लूट टोळीचा पर्दाफाश; पाच आरोपी जेरबंद समृद्धी महामार्गावरील सोनसाखळी लूट टोळीचा पर्दाफाश; पाच आरोपी जेरबंद
आधुनिक केसरी न्यूज वैजापूर : समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्रमांक १८ जवळ वाहन अडवून चालकाच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची...
किनवटचे पोलीस निरीक्षक गणेश कराडची नांदेडला तडकाफडकी बदली 
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी बीडच्या विकासाला नवी गती;१७ सप्टेंबरला रेल्वेची पुण्याशी तर डिसेंबरमध्ये मुंबईशी जोडणी
‘जीआर काढा अन् माझ्याकडे या; त्यात काय चूक आहे ते आम्ही सांगू! सरकारला जरांगे पाटलांचे थेट आव्हान
टेम्पोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार ठार 
नाशिक येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्यांची भेट, आंदोलन व मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा
गडचिरोलीतून ५० माजी नक्षलवाद्यांची स्वगृही वाटचाल; निरोपाच्या क्षणी भावुक झाले क्षण