पत्नीच्या खुन प्रकरणात मुख्यआरोपीस जन्मठेप..!

कंधार न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एन.पाटील यांचा महत्वपर्ण निकाल

पत्नीच्या खुन प्रकरणात मुख्यआरोपीस जन्मठेप..!

आधुनिक केसरी न्यूज 

वैजनाथ गिरी 

कंधार  : कंधार पोलीस ठाणे हद्दीतील बहादरपूरा ता.कंधार येथे दिनांक ३ मार्च २०२१ रोजी पत्नीची गळा आवळून हत्या केल्याच्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश कंधार मा.श्री. एम.एन.पाटील यांनी महत्वपूर्ण निकाल देत सदरील प्रकरणात मुख्य आरोपीस जन्मठेप कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दिनांक ०३ मार्च २०२१ रोजी बहादरपूरा ता. कंधार येथे यातील पिडीत महिलेचा पती नामे 1) ग्यानोबा नागोराव गायकवाड, 2) गिरीष नागोराव गायकवाड, (दिर) 3) नागोराव गायकवाड (सासरा) यांनी संगनमत करुन पिडीत महिलेस माहेरहून ऑटो घेण्यासाठी पैसे घेवन ये असे म्हणून शारिरीक व मानसिक त्रास देवून स्कार्पने गळा आवळून खुन केला, सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कंधार येथे गु.र.नं ९७/ २०२१ कलम ३०२, ४९८ (अ), ३४ भा. दं.वि. अन्वये कंधार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास कंधार पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी केला असून सदर प्रकरणात घटनास्थळ पंचनामा, जप्ती पंचनामा, FSL तपासणी, प्रत्येक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल व इतर आवश्यक सखोल तपास पूर्ण करून मा. न्यायालयात विहित वेळेत दोषारोपपत्र (चार्जशीट दाखल करण्यात आले होते. सदर खटला सेशन केस क्र. ४१/२०२१ अन्वये मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश-कंधार यांच्या न्यायालयात चालविण्यात आला.मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे आदेशाने मा. न्यायालयात चालु असलेल्या खटल्यांमधये विशेष लक्ष देण्यासाठी "TRIAL MONITORING CELL"ची स्थापना करण्यात आली आहे.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद करण्यात आला. तपासादरम्यान संकलित करण्यात आलेले पुरावे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची विश्वासार्ह साक्ष न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडण्यात आले.त्याची दखल घेत मा. न्यायालयाने आरोपीस कोणतीही सहानुभूती न दाखवता मुख्य आरोपी नामे ग्यानोबा नागोराव गायकवाड यास भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व रु. ५०००/- रुपये दंड, तसेच कलम ४९८ -A अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व रुपये १०००७- दंड, व कलम २०१ अन्वये ६ वर्षे सश्रम कारावास व रुपये २०००/- दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने सदर सर्व मूळ शिक्षा एकाच वेळी (concurrently) भोगावयाच्या असल्याचे आदेशित केले आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे महेश कागणे, सहाय्क सरकारी अभियोक्ता यांनी प्रभावीपणे बाजू मांडली आहे. त्यांना पोलीस उप निरीक्षक नईम खान, सहा. पोलीस उपनिरीक्षक एस.डी.मंडे व मगदुम शेख (पो.स्टे कंधार) यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अवैध गुटखा तस्करांना पोलिसांचा दणका..!  अवैध गुटखा तस्करांना पोलिसांचा दणका..! 
आधुनिक केसरी न्यूज माणिक सुर्यवंशी ‌देगलूर : शहर व परिसरात अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक तसेच विक्री...
पत्नीच्या खुन प्रकरणात मुख्यआरोपीस जन्मठेप..!
अजितदादांच्या जाण्याचं दुःख किती आहे हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार; अजितदादांच्या अपघाताचे राजकारण कुणी करु नका - सुनेत्रा पवार
मोक्कातील ‘मुक्या’ अखेर एलसीबीच्या जाळ्यात!
सांगली-तासगाव-बारामती महामार्गावरील प्रश्न तातडीने सोडवा - माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, नगरसेवक हर्षवर्धन पाटील  जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडे मागणी
आश्चर्य दुष्काळातही भगवानगडाच्या पायथ्याशी विहीर तुडुंब!
राजूर येथे मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन:मराठा समाज आक्रमक,बाजारपेठ कडकडीत बंद