अवैध गुटखा तस्करांना पोलिसांचा दणका..! 

७ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त चार आरोपींवर गुन्हा दाखल; कार, ऑटो व गुटखा जप्त पोलिसांची कारवाई

अवैध गुटखा तस्करांना पोलिसांचा दणका..! 

आधुनिक केसरी न्यूज 

माणिक सुर्यवंशी ‌

देगलूर : शहर व परिसरात अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक तसेच विक्री करणाऱ्यांविरोधात देगलूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत चार आरोपींवर कायदेशीर कारवाई करून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार, ऑटो व गुटखा असा एकूण ७ लाख ५८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी देगलूर पोलिसांना शहरात अवैध गुटखा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नांदेड रोडवरील मोहमद जाबेर शेख यांच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत सापळा रचून कारवाई केली.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ, प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे देगलूर, तसेच मपोउपनिरीक्षक किरण बेंबडे, पोलीस कर्मचारी घुके व चामलवाड यांच्या पथकाने केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सय्यद मसीयोद्दीन उर्फ बबलू पी. सय्यद रियाजोद्दीन (वय २५, रा. घुमट बेस, देगलूर) याच्या ताब्यातील Ertios कार (क्र. MH-12GZ-2345) मधून प्रतिबंधित सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. सदर वाहनाची अंदाजे किंमत ५ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच आरोपी शेख सलमान शेख जानी (वय २९, रा. घुमट बेस, देगलूर) याच्या ताब्यातील ऑटो (क्र. MH-26G-2298) मधूनही प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
याशिवाय हनमंत विठ्ठल थडके (वय ५०, रा. रोहिदास चौक, देगलूर) याच्या ताब्यातील नरेंद्र मिल्क डेअरी दुकानातून तसेच अशोक लक्ष्मण कोडवाड (वय अंदाजे २८, रा. लाईन गल्ली, देगलूर) याच्या ताब्यातील दुकानातून प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
चारही ठिकाणांहून जप्त केलेल्या प्रतिबंधित पदार्थांसह वाहने असा एकूण ७ लाख ५८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी देगलूर पोलीस ठाणे गु.र.नं. ४१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील संबंधित कलमांनुसार दि. ३ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भगवान मोरे हे करीत आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ, मपोउपनिरीक्षक किरण बेंबडे, पोलीस कर्मचारी चामलवाड व घुके यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात देगलूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अवैध गुटखा तस्करांना पोलिसांचा दणका..!  अवैध गुटखा तस्करांना पोलिसांचा दणका..! 
आधुनिक केसरी न्यूज माणिक सुर्यवंशी ‌देगलूर : शहर व परिसरात अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक तसेच विक्री...
पत्नीच्या खुन प्रकरणात मुख्यआरोपीस जन्मठेप..!
अजितदादांच्या जाण्याचं दुःख किती आहे हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार; अजितदादांच्या अपघाताचे राजकारण कुणी करु नका - सुनेत्रा पवार
मोक्कातील ‘मुक्या’ अखेर एलसीबीच्या जाळ्यात!
सांगली-तासगाव-बारामती महामार्गावरील प्रश्न तातडीने सोडवा - माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, नगरसेवक हर्षवर्धन पाटील  जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडे मागणी
आश्चर्य दुष्काळातही भगवानगडाच्या पायथ्याशी विहीर तुडुंब!
राजूर येथे मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन:मराठा समाज आक्रमक,बाजारपेठ कडकडीत बंद