जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाज आक्रमक; गंगापुरात रास्ता रोको

जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाज आक्रमक; गंगापुरात रास्ता रोको

आधुनिक केसरी न्यूज 

ज्ञानेश्वर अमृते पाटील

गंगापूर : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तसेच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गंगापूर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाला युवक, महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मनोज जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलनाला सर्व समाजातील नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवित होते. रास्ता रोकोमुळे काही काळ गंगापूर-वैकुंठ तसेच गंगापूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शहरातील आठवडी बाजार आणि पाचोडच्या सणामुळे वाहनांची मोठी गर्दी झाल्याने नागरिकांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात होते. आंदोलनाचे निवेदन तहसील प्रशासनाच्या वतीने स्वीकारण्यात आले.

रुग्णवाहिकांना आंदोलकांनी दिली वाट

रास्ता रोको आंदोलन सुरू असतानाही आंदोलकांनी मानवतेचे दर्शन घडवत रुग्णवाहिकांना अडथळा होऊ दिला नाही. तीन रुग्णवाहिका आंदोलनस्थळी आल्यानंतर आंदोलकांनी तत्काळ मार्ग मोकळा करून दिला. रुग्णांना सुरक्षितपणे पुढे जाण्यासाठी आंदोलकांनी स्वतः पुढाकार घेतल्याने त्यांच्या या भूमिकेचे कौतुक करण्यात आले. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाज आक्रमक; गंगापुरात रास्ता रोको जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाज आक्रमक; गंगापुरात रास्ता रोको
आधुनिक केसरी न्यूज  ज्ञानेश्वर अमृते पाटील गंगापूर : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तसेच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील...
बदनापूर पोलिसांची धडक कारवाई, १ लाख ८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
अवैध गुटखा तस्करांना पोलिसांचा दणका..! 
पत्नीच्या खुन प्रकरणात मुख्यआरोपीस जन्मठेप..!
अजितदादांच्या जाण्याचं दुःख किती आहे हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार; अजितदादांच्या अपघाताचे राजकारण कुणी करु नका - सुनेत्रा पवार
मोक्कातील ‘मुक्या’ अखेर एलसीबीच्या जाळ्यात!
सांगली-तासगाव-बारामती महामार्गावरील प्रश्न तातडीने सोडवा - माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, नगरसेवक हर्षवर्धन पाटील  जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडे मागणी