उमरी दहीहंडी उत्सवाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे-कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांचे नागरिकांना आवाहन

उमरी दहीहंडी उत्सवाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे-कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांचे नागरिकांना आवाहन

आधुनिक केसरी न्यूज 

साईनाथ हमदे

उमरी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उमरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवात नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन संचालक KD BOSS कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांनी केले आहे.
उमरी शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, गोविंदा पथकांकडून दहीहंडी फोडण्याचा थरार नागरिकांना अनुभवता येणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उत्सवात सर्व समाजघटकांनी एकत्रित सहभागी होऊन बंधुभाव, एकोपा आणि सामाजिक सलोखा जपावा, असेही कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांनी सांगितले. दहीहंडी उत्सव हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून आपल्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा उत्सव असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सुप्रसिद्ध हिंदवी पाटील यांच्या लावणीचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे व काॅमेडी कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे. उत्सव यशस्वी करण्यासाठी आयोजक, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून जय्यत तयारी सुरू असून,दिं.९/सप्टेंबर रोज सां.६ वाजता स्थळ; गोरठेकर काॅप्मल्कॅस मोठा मैदान उमरी तर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

उमरी दहीहंडी उत्सवाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे-कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांचे नागरिकांना आवाहन उमरी दहीहंडी उत्सवाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे-कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांचे नागरिकांना आवाहन
आधुनिक केसरी न्यूज  साईनाथ हमदे उमरी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उमरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवात नागरिकांनी हजारोंच्या संख्येने...
अधिवक्ता परिषदेतर्फे जामीन व अटकपूर्व जामिनावर अभ्यासपूर्ण व्याख्यान
चंद्रपूरच्या अधीरने देशात पटकावला पाचवा क्रमांक; श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
मनोज जरांगेंनी पाणी अन् सलाईन सोडले! आंदोलनाचा आज नववा दिवस
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाज आक्रमक; गंगापुरात रास्ता रोको
बदनापूर पोलिसांची धडक कारवाई, १ लाख ८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
अवैध गुटखा तस्करांना पोलिसांचा दणका..!