कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ करा : न्यायमूर्ती संदीप शिंदे

कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ करा : न्यायमूर्ती संदीप शिंदे

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : दि. ८ (विमाका)  उपलब्ध कागदोपत्री नोंदी, वंशावळ व संबंधित पुराव्यांची नियमानुसार पडताळणी करून पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ व पारदर्शकपणे करावी, असे मार्गदर्शन न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी आज केले.

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी न्यायमूर्ती श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक झाली. विभागीय आयुक्त कार्यालयातून न्यायमूर्ती शिंदे यांनी बैठकीस मार्गदर्शन केले.

यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, सह आयुक्त मंजूषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष व सदस्य दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत उपलब्ध कागदोपत्री नोंदी, वंशावळ पडताळणी, प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती तसेच स्थानिक पातळीवरील यंत्रणांच्या भूमिकेचा आढावा घेण्यात आला. उपलब्ध नोंदींच्या आधारे पात्र प्रकरणांची कार्यवाही नियमानुसार करण्याबाबत न्यायमूर्ती शिंदे यांनी मार्गदर्शन केले. हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीत शासन निर्णयातील तरतुदींचा विचार करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी. तसेच ग्राम व तालुका पातळीवरील यंत्रणांनी अर्जदारांना आवश्यक नोंदी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये संबंधित प्रकरणांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. उपलब्ध नोंदींचा प्रभावी वापर करून पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत विभागातील जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील प्रमाणपत्र प्रक्रियेची सद्यस्थिती आणि करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गोंदिया - बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू, 7 गंभीर गोंदिया - बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू, 7 गंभीर
आधुनिक केसरी न्यूज गोंदिया : गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा - मोहरानटोली येथे ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात...
कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ करा : न्यायमूर्ती संदीप शिंदे
पळसवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; शेळीवर हल्ला करून ठार
श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाख रुपयांची मदत
भोकरला भूमाफीयांच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या मयताच्या आईने दिली तक्रार
धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बिलोलीत तहसीलवर धडक मोर्चा
जय भवानी गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर..!