नवीन वीज जोडणीसाठी ५ हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमन जाळ्यात

नवीन वीज जोडणीसाठी ५ हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमन जाळ्यात

आधुनिक केसरी न्यूज 

वैजापूर : नवीन वीज जोडणी देण्यासाठी शेतकऱ्याकडून ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमनविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या कारवाईत लाचेची रक्कम स्वीकारताना वायरमनला रंगेहात पकडण्यात आले असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नवनाथ दादा बेळे (वय ५०), कनिष्ठ अभियंता, वर्ग-३, महावितरण उपकेंद्र खंडाळा, ता. वैजापूर, तसेच महेश शंकर पाडळे (वय २६), वायरमन, सबस्टेशन खंडाळा अशी आरोपींची नावे आहेत.

वैजापूर तालुक्यातील एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने नवीन वीज जोडणीसाठी १ सप्टेंबर २०२६ रोजी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर अर्जाच्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता नवनाथ बेळे यांची भेट घेण्यासाठी तक्रारदार गेला असता, नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे दिली.

तक्रारीची पडताळणी ७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आली. त्यावेळी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ८ सप्टेंबर २०२६ रोजी वैजापूर तालुक्यातील बिलोनी येथील शेत गट क्रमांक २२ मध्ये सापळा रचण्यात आला. नवीन वीज जोडणीसाठी आलेल्या वायरमन महेश पाडळे याने तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहात पकडले.

या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. आरोपींना ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३.४५ वाजता ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालनाचे पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, पोलीस हवालदार अतिश तिडके, गजानन खरात, अशोक राऊत, संदीप लहाने पोलीस नाईक गजानन कांबळे आणि संदीप लहाने यांनी केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नवीन वीज जोडणीसाठी ५ हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमन जाळ्यात नवीन वीज जोडणीसाठी ५ हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमन जाळ्यात
आधुनिक केसरी न्यूज  वैजापूर : नवीन वीज जोडणी देण्यासाठी शेतकऱ्याकडून ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमनविरुद्ध लाचलुचपत...
कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मामा-भाचीचा जागीच दुर्दैवी मृत्यू!
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; मध्यरात्रीपासून उपचार सुरू
गोंदिया - बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू, 7 गंभीर
कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ करा : न्यायमूर्ती संदीप शिंदे
पळसवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; शेळीवर हल्ला करून ठार
श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाख रुपयांची मदत