नळदुर्ग जवळ भीषण अपघात: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझर पलटी होऊन, 5 जण जागीच ठार

नळदुर्ग जवळ भीषण अपघात: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझर पलटी होऊन, 5 जण जागीच ठार

आधुनिक केसरी न्यूज

महेश गायकवाड 

सोलापूर : हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर  अणदूर जवळ आज (शनिवारी) सकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण उळे (सोलापूर) येथील रहिवासी असलेले हे प्रवासी एका क्रुझर जीपमधून सोलापूरहून नळदुर्ग येथील देवदर्शनासाठी निघाले होते.

सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील धाराशिवजवळील अणदूर परिसर. अचानक क्रुझर गाडीचे टायर्स फुटले, त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली ही जीप रस्त्यावरील एका ट्रॅक्टरला धडकली आणि त्यानंतर रस्त्यावर पलटी झाली. धडक इतकी जोरदार होती की, गाडीच्या एका बाजूचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.

नागरिकांची मदत आणि बचावकार्य!

अपघात होताच आजूबाजूचे नागरिक तात्काळ मदतीसाठी धावले. नागरिकांनी तातडीने एकत्र येत जोर लावून पलटी झालेली क्रुझर गाडी सरळ केली. त्यानंतर गाडीतून मृतदेह आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

स्थानिक नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून प्रशासनाला माहिती दिली. सध्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य आणि पुढील तपास सुरू आहे.

या अपघातामुळे सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी वाहन चालवताना वेग मर्यादेचे पालन करणे आणि क्षमतेनुसारच प्रवासी वाहतूक करणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

धाराशिव अपघातातील मृतांमध्ये तीन महिला असून  दोन पुरुष आहेत, अपघातावेळी क्रुझरमधील प्रवासी सोलापूर हून  नळदुर्गकडे निघाले होते. या अपघातामुळे सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक अनेक तास विस्कळीत झाली होती 
अपघातातील जखमींना उपचारासाठी सर्वांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

टोलनाक्यावर वाद सोडवणाऱ्या पोलिसावर हल्ला; आठ जण अटकेत टोलनाक्यावर वाद सोडवणाऱ्या पोलिसावर हल्ला; आठ जण अटकेत
आधुनिक केसरी न्यूज  त्रिसिंग जायभाये   अंबड ग्रामीण : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळील भोकर वाडी टोलनाक्यावर टोल भरण्यावरून सुरू असलेला...
कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातून युवक सक्षम व आत्मनिर्भर बनणार : आमदार देवतळे
गावच्या चर्चेने पतीच्या मृत्यूचे खापर प्रियकरावर;सिडीआरने पत्नीचाही ‘मुखवटा’ उतरवला..!
खाकीला आधुनिक ‘बळ’आ.दानवेंच्या पाठपुराव्याला यश; भोकरदन-जाफ्राबादच्या चार ठाण्यांना १६.५३ कोटी मंजूर
‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला तेच लोक विरोध करत आहेत ज्यांनी सावित्रीमाई फुलेंवर दगड व शेणाचे गोळे फेकले : कन्हैयाकुमार
21ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
विद्यार्थिनीचा पाठलाग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी; जामोद येथे तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा