राज्यातील सर्व समाजघटकांना न्याय देत रस्ते, विज, आरोग्य , शिक्षण, पाणी पुरवठा योजनांसाठी भरीव तरतूद करुन राज्याला तिव्र गतीने विकसित करणारा अर्थसंकल्प

राज्यातील सर्व समाजघटकांना न्याय देत रस्ते, विज, आरोग्य , शिक्षण, पाणी पुरवठा योजनांसाठी भरीव तरतूद करुन राज्याला तिव्र गतीने विकसित करणारा अर्थसंकल्प

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : आज दि.१० मार्च २०२५ रोजी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील ११ वा राज्याला विकसित भारताच्या धर्तीवर विकसित महाराष्ट्राची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्पात राज्यातील सर्व समाजघटकांसाठी विविध विभागांकडून सुरू असलेल्या योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली. रस्ते, विज, आरोग्य, शिक्षण आणि पाणी पुरवठा योजनांसाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करुन राज्यातील जनतेचे जिवनमान सुसह्य करण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करुन राज्याला उद्योगस्नेही बनवत राज्यातील तरुण युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढे पाऊल टाकलेले आहे. तसेच नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मुबलक सिंचनाची सोय उपलब्ध करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी धोरण आखण्यात आल्याबद्दल आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांनी शासनाचे आभार मानत अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गडचिरोलीतून ५० माजी नक्षलवाद्यांची स्वगृही वाटचाल; निरोपाच्या क्षणी भावुक झाले क्षण गडचिरोलीतून ५० माजी नक्षलवाद्यांची स्वगृही वाटचाल; निरोपाच्या क्षणी भावुक झाले क्षण
आधुनिक केसरी न्यूज   चंद्रकांत पतरंगे गडचिरोली : वर्षानुवर्षे जंगलात घालवलेले आयुष्य मागे सोडून कुटुंबाच्या मायेच्या सावलीत परतण्याची वेळ आली अन्...
तोटंबा घाटात कमांडर जीपचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
वरिष्ठ अधिकारी झोपेत, ग्रामसेवक गायब; वझरगा ग्रामपंचायतीत संतापाचा उद्रेक..!
चंद्रपूर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार
वर्धा पोलीस मुख्यालयातील 'शस्त्र गोळीबार प्रशिक्षण' यशस्वी; अंमलदार संभाजी मुंढकर यांचा गौरव
टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती ; समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली
वर्धा राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’ होणार : मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत