भाजपाच्या महाअधिवेशनाकरिता चंद्रपूर मधून शेकडो कार्यकर्ते शिर्डीकडे रवाना

भाजपाच्या महाअधिवेशनाकरिता चंद्रपूर मधून शेकडो कार्यकर्ते शिर्डीकडे रवाना

आधुनिक केसरी न्यूज 

शिर्डी : येथे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र महाअधिवेशन होणार असून, आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूरमधील भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्ते शिर्डीकडे रवाना झाले आहेत. या प्रवासासाठी पाच बस आणि चारचाकी वाहने यांचा वापर करण्यात आला असून, सर्व कार्यकर्ते शिर्डीत दाखल होणार आहेत. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या महाअधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. चंद्रपूरमधील कार्यकर्त्यांनी प्रचंड ऊर्जा, राष्ट्रसेवेची बांधिलकी आणि दृढ संकल्पाने या प्रवासाला सुरुवात केली आहे. या प्रवासात महिला, पुरुष, युवा, तसेच वरिष्ठ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. शिस्तबद्ध संघटन, देशसेवा, आणि एकात्मतेच्या भावनेने प्रेरित हे कार्यकर्ते शिर्डीकडे मार्गक्रमण करत आहेत. महाअधिवेशनात पक्षाच्या धोरणांचा आढावा घेऊन आगामी दिशा ठरवली जाणार आहे. यामध्ये कार्यकर्त्यांसाठी संघटनात्मक बळकटीवर मार्गदर्शन, आगामी निवडणुकांसाठी रणनीती ठरवणे, तसेच जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी नव्या उपक्रमांची चर्चा होणार आहे.चंद्रपूर मतदारसंघातील कार्यकर्ते पक्षाच्या उद्दिष्टांसाठी सतत तत्पर असतात आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पक्षसंघटना अधिक बळकट होत आहे. "या महाअधिवेशनातून नव्या दिशा मिळतील असे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..! भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..!
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया :  गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातील बांध तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर भरदिवसा प्राणघातक...
लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा
जाखमाथ्याजवळ भीषण अपघात स्कुटीला पाठीमागून पल्सरची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!