वाघाने पाडला गायीचा फडशा ; शेतकऱ्यांमध्ये दहशत
आधुनिक केसरी न्यूज
सुलतानपुर : खुलताबाद तालुक्यातील खांडीपिपळगाव येथील शेतकरी मंजाराम बोरसे यांच्या मालकीच्या खांडीपिपळगाव येथील गट क्रंमाक २२९ गोठ्यातील सात ते आठ जनावरे बाधलेली होती . दि ४ रोजी राञी वाघाने हल्ला केला. त्यामुळे गोठ्यातील जनावरे दावे तोडून वाटेल तिकडे पळून गेली, परंतु एक गाय गोळेगाव शिवारात पळून गेली तर ति गाय वाघाच्या तावडीत सापडली असता वाघाने तिचा गळा फोडला. व गाय मरण पावली. शेतकरी बोरसे हे सकाळी जनावरांना चारा पाणी करण्यासाठी तसेच दुध काढण्यासाठी उठले असता गोठ्यात जनावरे दिसली नाही. त्यांना वाटले आपले जनावरे चोरीला गेली कि काय परंतु शोध घेत असताना त्यांना वाघाच्या पाऊल असल्याचा संशय आला. हि बाब त्यांनी गावातील शेतकऱ्यांना सांगितले व जनावरांना शोधण्यासाठी गेले असता ,गोळेगाव शिवारात मृत अवस्थेत गाय दिसली , वाघाने गायीला माळल्याचा संशय त्यांना आला. तात्काळ त्यांनी वनविभागाला कळविले. या मुळे शेकऱ्याचे पन्नास ते पच्चावन हजार रु किमतीचे नुकसान झाले. यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकरी खरीपाच्या तयारीला लागले आहेत. मान्सूनचा पाऊस पडला की, शेतात पेरणीकरीता शेतक-यांची शेतांकडे धाव असते. त्यानंतर पिकांच्या रखवालीकरीता अशातच शेतशिवारातही वाघ मुक्तसंचार करीत असल्याने या भागातील शेतक-यांसह शेतमजुरांच्या अडचणीत भर पडली आहे. विशेष म्हणजे या भागात अनेक दिवसांपासून वाघाचे दर्शन घडले असे ऐकायला मिळते. ही प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. परंतु, याकडे वनविभागाने सातत्याने दुर्लक्षच केले आहे.
सध्या खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतामध्ये मशागतीचे कामे करण्यासाठी शेतकरी जात आहेत. वाघाचा मुक्तसंचार सुरू असल्याने आता शेतकर्यांमध्ये पेरणीच्या तोंडावार वाघाची दहशत पसरली आहे. नुकसानग्रस्त पशुपालकालाशासकीय मदत देत वन्यप्राण्यांचा बंदोबस्त लावावा, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List