कोल्हा आला रे…! खोकड जातीचा कोल्हा मानवी वस्तीत
अकोला : प्रचंड प्रमाणात होत असलेली वृक्ष तोड,माणसाने जंगलात केलेला हस्तक्षेप,त्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीत दाखल होत आहे.यांच जीवंत उदाहरण अकोल्याच्या सनसिटी कॉलनीत पहायला मिळाले. सध्या मोठ्या प्रमाणात उन तापत असून,पाण्याच्या शोधत जंगलातील प्राणी गावाच्या आसपासच्या परिसरात येत आहे.अकोल्यातील सनसिटी काँलनीत रात्रीच्या वेळी खोकड / कोल्हा हा वन्यजिव बसलेला दिसला . येथील संजय नाकट व… Continue reading कोल्हा आला रे…! खोकड जातीचा कोल्हा मानवी वस्तीत
अकोला : प्रचंड प्रमाणात होत असलेली वृक्ष तोड,माणसाने जंगलात केलेला हस्तक्षेप,त्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीत दाखल होत आहे.यांच जीवंत उदाहरण अकोल्याच्या सनसिटी कॉलनीत पहायला मिळाले. सध्या मोठ्या प्रमाणात उन तापत असून,पाण्याच्या शोधत जंगलातील प्राणी गावाच्या आसपासच्या परिसरात येत आहे.
अकोल्यातील सनसिटी काँलनीत रात्रीच्या वेळी खोकड / कोल्हा हा वन्यजिव बसलेला दिसला . येथील संजय नाकट व बाप्पू देशमुख यांनी मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे याना माहिती दिली . त्यांनी ताबडतोब आर एफ ओ ओवे व वनपाल इंगळे याना सांगितले . लगेच बाळ काळणे ‘ चालक यश पाल इंगळे व अक्षय खंडारे हे गेले . बाळ काळणे यांनी अतिशय संयमरित्या हया खोकड वन्य जिवास पकडून सुरक्षित केले व पोत्यात टाकले . यांचे दात फार अणुकुचीदार असल्यामुळे चावा जबरदस्त असतो . उन्हामुळे तहान लागते त्यामुळे हया दिवसात वन्यजिव जवळपासच्या मानवी वस्तीत येतात . तरी वन्यजिव वाचविणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे . तरच निसर्ग सृष्टीचे संरक्षण होईल असे बाळ काळणेंनी व्यक्त केले . खोकड हा कोल्हातील प्रजाती आहे . मात्र फारच अल्प संख्येत असलयामुळे दिसत नाहीत शेतक ऱ्यांचा जवळचा मित्र आहे . उंदीर , घुशी ‘ लहान साप, खेकडे विंचू यावर भक्ष करून नियंत्रण ठेवतो . दिवसभर एकाच ठिकाणी लपुन राहणे व रात्री बाहेर निघणे हा प्रमुख गुणधर्म आहे . यांची संख्या बंगाल मध्ये जास्त आहे .खरे तर,उन्हाळ्यात पाण्याची सोय वन्यजीवासाठी व्हावी यासाठी वनविभागासह लोकांनी सुध्दा आप आपल्या परिने व्यवस्था करावे तसेच वन्यजीव वाचविणे सर्वांचे कर्तव्य आहे.

About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List