पडोली अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी..!

पडोली अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी..!

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : दि. 30/6/2026 पडोली येथे पाच वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण समाज अस्वस्थ झाला आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणात पीडितेला तातडीने न्याय मिळावा, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी आणि न्यायालयीन प्रक्रिया प्रभावीपणे पार पडावी, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

या खटल्यात शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविण्यात यावा, अशी प्रमुख मागणी केली. याशिवाय पीडित चिमुरडी आणि तिच्या कुटुंबाला आवश्यक वैद्यकीय, मानसिक व कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासह भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी बालकांच्या सुरक्षेबाबत अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणीही करण्यात आली.  या प्रकरणात कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही. पीडितेला न्याय मिळेपर्यंत माझा पाठपुरावा कायम राहील असे जोरगेवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले
  आधुनिक केसरी न्यूज   त्रिसिंग जायभाये  वडीगोद्री : वडीगोद्री-जालना मार्गावरील धाकलगाव जवळ रिक्षा आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालक गंभीर
पडोली अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी..!
खोटारड्या भाजपा सरकारकडून बळीराजाचा विश्वासघात, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ
वडीगोद्री परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; गाय व शेळीवर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
समृद्धी महामार्गावरील अपघातात  चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जण ठार 
गद्दार खासदारांची गाढवावरून धिंड..! 
नागभीडमध्ये हगवण-उलटीच्या रुग्णांमध्ये वाढ; पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी..!