रात्रीच्या शांततेत रस्त्याचे कडेला सापडले निष्पाप स्त्री जातीचे नवजात अर्भक

'आई' या शब्दाचा अर्थ बदलून टाकणारी घटना

रात्रीच्या शांततेत रस्त्याचे कडेला सापडले निष्पाप स्त्री जातीचे नवजात अर्भक

आधुनिक केसरी न्यूज

सोपान कोळकर

बदनापूर : पोलीस ठाण्याच्या हद्दीत (ता.०१) रोजी जालना - छत्रपती संभाजीनगर रोडरील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ नवजात अर्भक अज्ञात व्यक्तीने सोडून दिले आहे अशी माहिती एका इसमाने ११२ क्रमांकावर दिली. मिळालेल्या माहिनुसार रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार गोविंद डोभाल, पोलीस नाईक राजेंद्र वेलदोडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अंदाजे पाच दिवसांचे स्त्री जातीचे नवजात अर्भक जिवंत स्थितीत आढळून आले.पोलिसांनी त्यास बदनापूर येथील शासकीय दवाखान्यात प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर जालना येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले आहे.अज्ञात जन्मदात्यांनी अपत्य जन्माची लपवणूक करुन ते नवजात अर्भकाला रस्त्याच्या कडेला सोडून दिले असल्याचे निदर्शनास आले असून या कृत्यामुळे अर्भकाच्या जीवास व आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याने अज्ञात जन्मदात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांनी दिली आहे. 

स्त्री जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही बदलला नाही हे या घटनेवरून सिद्ध होते.

बातमी पसरताच तालुक्यात हळहळ व्यक्त झाली. “आई” या शब्दाचा अर्थ बदलून टाकणारी ही घटना प्रत्येकाच्या हृदयाला भिडली.एकीकडे अनेक सामाजिक संघटना स्त्री भ्रूणहत्या विरोधात लढा तीव्र करत असताना, दुसरीकडे स्त्री जातीचे अर्भक सापडले हे अत्यंत निंदनीय बाब आहे. म्हणजे आजही समाजामध्ये स्त्री विषयक किती द्वेष केला जातो, स्त्री जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही बदलला नाही हे या घटनेवरून सिद्ध होते. मात्र, आज बदनापूरमध्ये सापडलेल्या या स्त्री जातीचे अर्भकामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल,अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपनी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक एम.टी.सुरवसे,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती स्नेहा करेवाड,पोलीस अंमलदार गोविंद डोभाल, पोलीस नाईक राजेंद्र वेलदोडे व पोलीस शिपाई आधार भिसे या बालकाच्या जन्मदात्यांचा शोध घेण्यासाठी तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

समृद्धीच्या रिंगरोडला धडकून साखरखेर्ड़्याचे दोघे जागीच ठार दुसरबीड येथील समृद्धी महामार्गाजवळील घटना समृद्धीच्या रिंगरोडला धडकून साखरखेर्ड़्याचे दोघे जागीच ठार दुसरबीड येथील समृद्धी महामार्गाजवळील घटना
आधुनिक केसरी न्यूज सिदखेडराजा : दि. १ नोव्हेंबर साखरखेर्डा येथील दोन तरुणांचा समृद्धी महामार्गाच्या रिंग रोडवर झालेल्या भीषण अपघातात जागीच...
रात्रीच्या शांततेत रस्त्याचे कडेला सापडले निष्पाप स्त्री जातीचे नवजात अर्भक
सोलापुरात धक्कादायक : 10 जणांकडून महिला कर्मचाऱ्याचा ऑफिस मध्येच लैंगिक छळ, महिला आत्महत्या करण्याच्या तयारीत!
शेतात राबणाऱ्या बाबासाहेब मनाळचा विहीरीत पडुन दुर्दैवी मृत्यू गंगापूर तालुक्यात शोककळा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी?
पाचोरा भडगाव कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज सायंकाळी पाच वाजता शिवसेना युवा सेना निर्धार मेळाव्याचे आयोजन
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक