अंढेरा शिवारात जुळ्या मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या, आरोपी पित्याने वाशीम पोलिसात केले आत्मसमर्पण

अंढेरा शिवारात जुळ्या मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या, आरोपी पित्याने वाशीम पोलिसात केले आत्मसमर्पण

आधुनिक केसरी न्यूज

देऊळगाव राजा  : तालुक्यातील अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक हृदय पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. रुई (जि. वाशिम) येथील रहिवासी व पुण्यातील खाजगी कंपनीत काम करणारा राहुल चव्हाण या व्यक्तीने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण हा आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह प्रवास करत होता. प्रवासादरम्यान पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला. या वादानंतर पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला, तर संतापलेल्या राहुलने आपल्या दोन लहान मुलींना घेऊन पुढे वाटचाल केली. रागाच्या भरात त्याने अंढेरा फाटा परिसरातील जंगलात दोन्ही मुलींचा गळा कापून निर्दयपणे खून केला.
या अमानुष कृत्यांनंतर राहुल स्वतः वाशिम पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटना कबूल केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळी डीवायएसपी संतोष खराडे, ठाणेदार शक्करगे, पोलीस स्टेशन आसेगाव ए पी आय रामकृष्ण भाकडे, पी.सी लक्ष्मण महाले,पी.सी किशोर मारकड,एल.सी.बी वाशीम एच सी राहुल व्यवहारे.एन पी सी राजकुमार यादव, पी सी महेश वानखडे, डी पी सी मिलिंद चंदकेशाला.तसेच पोलीस अधिकारी जारवार, फूसे, जाधव आदी अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. निष्पाप दोन बालिकांचा जीव केवळ कौटुंबिक वादामुळे गेला, या दुर्दैवी घटनेमुळे समाज मन हेलावून गेले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’ ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’
आधुनिक केसरी न्यूज  भोकरदन : ढोल-ताशांचा कडकडाट, लेझीमचा ताल, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी गुरुवारी...
डासांचा ‘डंख’ वाढला; प्रभाग ९ मध्ये प्रशासनाला जागे करण्याची मागणी
तिरंग्याच्या साक्षीने’ भोकरदन दुमदुमले; हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नायकुडपुऱ्यातील कच्याड युवा शक्ती नागराज मंडळाला सापडला सुंदर शुभ्र वर्णाचा नागराज..!
नांदेड येथे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला 
देगलूर तालुक्यातील गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य; संचालक जनार्धन बिरादार यांचे आवाहन
भोकरदनच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ची गस्त, पोलीस चौकी अन् CCTVची मागणी;अनिता जाधव आक्रमक