मर्डर आरोपीच्या शिरपूर तालुका पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

आरोपीची विळ्याने वार केल्याची कबुली 

मर्डर आरोपीच्या शिरपूर तालुका पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

आधुनिक केसरी न्यूज 

धुळे : गाव कनगई तालुका शिरपूर येथे दि. 16 रोजी रात्री 08.30 वा. राजेश प्रेमसिंग पावरा याने त्याचा मामेभाऊ रणजित भाट्या पावरा यास किरकोळ कारणावरून डोक्यावर मागील बाजुस विळ्याने मारुन गंभीर दुखापत केली होती, नंतर रणजितचा उपचार कामी नेत असताना मृत्यू झाला असल्याने त्याचा भाऊ भोंग्या भाट्या पावरा याचे फिर्यादीवरुन शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी राजेश पावरा हा गुन्हा केल्यानंतर फरार झाला असल्याने वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे आरोपीताचा शोध घेणे सुरू होते. तेंव्हा राजेश रत्नागिरी येथे पळून जात आहे अशी गोपनिय माहिती मिळाल्याने शिरपूर तालुका पोलीसांच्या पथकाने आरोपी राजेश प्रेमसिंग पावरा यास धुळे बस स्थानक येथुन ताब्यात घेतले आहे. त्यास गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असुन सदर घटनास्थळावरुन फॉरेन्सीक पथक धुळे यांचे मदतीने गुन्ह्यात वापरण्यात आलेला विळा जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपूर भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई- कृष्णा पाटील, पोसई- बाळासाहेब वाघ, पोहेकॉ/11 राजु ढिसले, पोहेकॉ/745 संदिप ठाकरे, चापोहेकॉ/84 संतोष पाटील, पोकॉ/1454 संजय भोई, पोकॉ/1677 योगेश मोरे, पोकॉ/1676 भुषण पाटील, पोकॉ/1562 स्वप्निल बांगर, पोकॉ/920 मुकेश पावरा, पोकॉ/918 रोहिदास पावरा पोकॉ/685 जयेश मोरे पोकॉ/1727 सुनिल पवार, चापोकॉ/17 ईसरार फारुकी अशांनी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : दि. ९ सप्टेंबर २०२६ भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. पेपरफुटीने...
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप 
मेंढरांच्या तळावर बिबट्याचा हल्ला १ शेळी ठार
नवीन वीज जोडणीसाठी ५ हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमन जाळ्यात
कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मामा-भाचीचा जागीच दुर्दैवी मृत्यू!
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; मध्यरात्रीपासून उपचार सुरू
गोंदिया - बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू, 7 गंभीर