लाचखोरी : तलाठी महिलेवर धुळे एसीबीची कारवाई
आधुनिक केसरी न्यूज
आकाश सोनवणे
धुळे : पारोळा येथील तलाठी वर्षा रमेश काकुस्ते, यांनी तक्रारदाराकडून अधिकचे 25 हजाराच्या लाचीची मागणी केली धुळे लाच लुचपत प्रतिबंध विभाग यांनी सापळा रचून तलाठी वर्षा काकुस्ते यांच्यावर कारवाई करण्यात आले आहे . तलाठी वर्षा रमेश काकुस्ते, यांनी 25 हजाराच्या लाचीची मागणी केली होती. यातील तक्रारदार यांचा विट उत्पादनाचा व्यवसाय असून त्यांनी आरोपी यांचेकडे गौण खनिजाच्या रॉयल्टीपोटी 25000/- रुपये रक्कम कडे जमा केली होती. सदर रक्कमेची पावती न देता माती वाहतूक करण्यासाठी तलाठी ह्या अतिरिक्त 25,000/- लाचेची मागणी करीत असल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता तलाठी यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे 25000/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यामुळे तलाठी काकूस्थे यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन, धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सदरची कारवाही परिवेक्षण अधिकारी :अभिषेक पाटील पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे सापळा तपासी अधिकारी रूपाली खांडवी,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे सापळा पथक : पो.हवा.राजन कदम पो. शि. प्रशांत बागुल,चालक पो. शि. बडगुजर सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे मार्गदर्शक : -मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र, नाशिक माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि. नाशिक अश्यानी केली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List